जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अजितदादांनी राखला उद्धव ठाकरे यांच्या शब्दाचा मान, 'ते' नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

अजितदादांनी राखला उद्धव ठाकरे यांच्या शब्दाचा मान, 'ते' नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

अजितदादांनी राखला उद्धव ठाकरे यांच्या शब्दाचा मान, 'ते' नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

पारनेर येथील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली आणि सात दिवसाच्या महानाट्यावर अखेर पडदा पडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जुलै: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली आणि सात दिवसाच्या महानाट्यावर अखेर पडदा पडला. पाचही नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवबंधन बांधलं. तत्पूर्वी सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात ही भेट घडवून आणली. अजीत पवार, पाच नगरसेवक, हसन मुश्रीफ यांच्यात अर्ध्या तास चर्चा झाली. नंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन आले. हेही वाचा… मोठी कारवाई! ‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला घेतलं ताब्यात  स्थानिक नेतृत्वाबाबत आमची नाराजी होती… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांची नाराजी ऐकली. त्यांना पारनेरचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन दिलं. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पाणी प्रश्न सुटणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर नगरसेवकांनी घरवापसी केली. काय म्हणाले मिलिंद नार्वेकर… ‘अजित दादांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्र्यांचा मान राखला. शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपच्या मार्गावर होते. पण अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतलं. याबाबत मी अजित पवार यांना भेटलो होतो. आता त्याच नगरसेवकांनी घरवापसी केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीत कुरबुरी? दरम्यान, पारनेर येथील शिससेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा रंगली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता. त्यानंतर राष्ट्रवादीत गेलेल्या पाचही नगरसेवकांनी मुंबई गाठली आहे.

News18

..अन्यथा राजीनामे देऊ ; पारनेरच्या पाच नगरसेवकांचा निर्णय दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला नगरसेवक पुन्हा शिवसेनेत पाठविण्याचा निरोप देत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र,  असं असलं तरी आम्ही शिवसेनेत जाणार नाही. वेळ पडल्यास आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देऊ, असा इशारा पारनेर नगर पंचायतच्या पाचही नगरसेवकांनी दिला होता. याच मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेवकांनी आधी चर्चा केली. 4 जुलै रोजी पारनेर नगर पंचायतीचे शिवसेनेचे किसन गांधाडे, डॉ. मूद्द्सर सय्यद, नंदू देशमुख, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांनी बारामती येथे अजीत पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. पारनेर नगर पंचायतमध्ये असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसने येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सुरुंग लावली असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात होते. मात्र, वास्तविक पाहाता आम्ही शिवसेना पक्षावर किंवा पक्ष प्रमुखांवर नाराज नसून स्थानिक नेतृत्वामुळे आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या पाचही नगरसेवकांनी दिली आहे. हेही वाचा… बाळासाहेब ठाकरे यांचा ‘सामना’ आता शिल्लक राहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात पारनेर शिवसेनेत असलेले शिवसेनेचे माजी मंत्री तथा माजी आमदार विजय औटी यांची हुकूमशाहीला राजरोसपणे सुरू होती. आम्ही नगरसेवक असताना देखील आम्हांला शिपायाची वागणूक दिली जात असल्याची धक्कादायक माहिती नगरसेवकांनी बोलतांना दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात