Home /News /maharashtra /

बाळासाहेब ठाकरे यांचा 'सामना' आता शिल्लक राहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

बाळासाहेब ठाकरे यांचा 'सामना' आता शिल्लक राहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

आता प्रसिद्ध होणाऱ्या 'सामना'ला बेस नाही. आताचे अग्रलेख कसे छापले जातात हे सगळ्यांना माहिती आहे.

नाशिक, 8 जुलै: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा 'सामना' आता शिल्लक राहिला नाही. आता प्रसिद्ध होणाऱ्या 'सामना'ला बेस नाही. आताचे अग्रलेख कसे छापले जातात हे सगळ्यांना माहिती आहे. 'सामना' छापतो.. देव पळून गेले आणि उद्धव ठाकरे विठ्ठलाला साकडं घालतात, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. हेही वाचा...मोठी कारवाई! 'राजगृह' तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला घेतलं ताब्यात देवेंद्र फडणवीस आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, आयुक्त,जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, अधीक्षक उपस्थित होते. नाशिक नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्र सरकारने राज्य सरकारला भरीव मदत दिली. याची पुस्तिका छापली. राज्याच्या एकही मंत्री ते खोडू शकला नाही. राज्यातील सरकार अंतरविरोधानं पडेल, असं भाकित देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे... - अँटिजिन किट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होताय - सर्व हॉट स्पॉट वर तातडीने तपासणी केली पाहिजे - तर परिस्थिती नियंत्रणात येईल - नाशिक क्रिटिकल स्टेज मध्ये - प्रशासनाची तयारी नुसती कागदावर नको - मुंबईत पॉझिटिव्ह रुग्ण आकडा दिशाभूल करणारा - टेस्ट फक्त 3300 केल्या म्हणून पॉझिटिव्ह संख्या 806 आली - मुंबईत परिस्थिती अत्यंत भीषण आहे - फक्त नंबर कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी करताय - मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात टाकलं जातंय - मुंबईत हाय रिस्क कॉन्टॅक्टचं टेस्टिंगच होत नाही हेही वाचा...'ते' दोघे आणि 2000 हुन अधिक जण क्वारंटाइन, बीडमधील धक्कादायक घटना - मास टेस्टिंग सुरू करणे आवश्यक - सध्या समाधान वाटावं अशी परिस्थिती कुठेच नाही - राज्य सरकारने, महापालिकांना मदत केली पाहिजे - अधिकाऱ्यांच्या बदल्यात गडबड म्हणजे कुरघोडी आणि संवाद हीनता - पवार साहेबांना मध्यस्थी करावी लागते हे दुर्दैव - 3 पॉवर सेंटर असल्यानं हे होतंय
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Saamana, Sanjay raut, Shiv sena, Udhav thackarey

पुढील बातम्या