Home /News /maharashtra /

मोठी कारवाई! 'राजगृह' तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला घेतलं ताब्यात

मोठी कारवाई! 'राजगृह' तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला घेतलं ताब्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान 'राजगृह'वर मंगळवारी संध्याकाळी झालेल्या तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी करवाई केली आहे.

मुंबई, 8 जुलै: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान 'राजगृह'वर मंगळवारी संध्याकाळी झालेल्या तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी करवाई केली आहे. पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती संयुक्त पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. हेही वाचा.. 'राजगृह' तोडफोड प्रकरणी उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना दिले कठोर आदेश 'राजगृह'वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली होती. एवढंच नाही तर माथेफिरूंनी घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना दिले कठोर आदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'च्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, दादर भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृह'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. दुसरीकडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले असून राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं स्पष्ट केलं आहे. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. हेही वाचा... शरद पवार यांच्या 'मातोश्री' भेटीवरुन भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजगृहाला भेट दिली. तिथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या