मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mohan Delkar आत्महत्या प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयस्पद, पटोलेंचा आरोप

Mohan Delkar आत्महत्या प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयस्पद, पटोलेंचा आरोप

'मुळात वाटा आणि घाटा हा फडवणीस सरकार मध्ये पाहिला आहे. फडवणीस सरकारच्या काळात आरएसएसचे लोक किती होते हे जाहीर करणार आहे'

'मुळात वाटा आणि घाटा हा फडवणीस सरकार मध्ये पाहिला आहे. फडवणीस सरकारच्या काळात आरएसएसचे लोक किती होते हे जाहीर करणार आहे'

'मुळात वाटा आणि घाटा हा फडवणीस सरकार मध्ये पाहिला आहे. फडवणीस सरकारच्या काळात आरएसएसचे लोक किती होते हे जाहीर करणार आहे'

मुंबई, 24 मार्च :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter)यांच्या पत्रावरून महाविकास आघाडी सरकार (MVA Government) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 'परमबीर सिंग यांची खासदार मोहन डेलकर प्रकरणात (mohan delkar case) संशयास्पद भूमिका होती, असा गंभीर आरोप केला आहे. तसंच, मी गृहमंत्री असतो तर परमबीर सिंग यांना निलंबित केलं असतं, असंही पटोले म्हणाले.

खासदार मोहन डेलकर प्रकरणात परमबीर सिंग  यांची भूमिका संशयस्पद आहे. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे.  जर मी मंत्री असतो तर परमबीर सिंग यांना मी निलंबित केले असते,वास्तविक परबमवीर सिंग यांना तात्काळ निलंबन केले असते, आणि करायला हवे होते हे माझे ठाम मत आहे', असंही पटोले म्हणाले.

भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीत पाहता हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. भाजप नेत्यांच्या मागणीचा नाना पटोले यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.

EXPLAINER : गब्बरचा एण्ड जवळ, शिखर धवनचं दोन फॉरमॅटमधलं करियर संपलं?

'विरोधी पक्ष चुकीच्या मार्गावर जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे, घटना मागे काय आहे, हे यंत्रनेनं सांगावे. पण विरोधी पक्ष हाच चुकीच्या मार्गाने जात आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने कोणाची बाहुली होऊन नये', अशी टीका नाना पटोले यांनी केली.

'अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने वापर केला जात आहे, महाराष्ट्रासाठी योग्य नाही. विरोधी पक्षा जनतेचा मुद्दा मांडत नाही. आज कोरोना लस महाराष्ट्रात दिली जात नाही. मुळात वाटा आणि घाटा हा फडवणीस सरकार मध्ये पाहिला आहे. फडवणीस सरकारच्या काळात आरएसएसचे लोक किती होते हे जाहीर करणार आहे', असंही पटोले यांनी सांगितलं.

IPL खेळणार नाही या संघाचा कर्णधार? इंग्लडविरुद्धच्या सामन्यात गंभीर दुखापत

'राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका संशयास्पद आहे, राजभवन कार्यालय भाजपामय झाले आहे. कोणत्याही मुद्दा घेऊन भाजपचे नेते राजभवनावर पोहोचत आहे', अशी टीकाही पटोलेंनी केली.

'फडणवीस सरकारमध्ये फडणवीस हे न्यायाधीश झाले होते. अनेक प्रकरणं त्यांच्या काळात समोर आली होती. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण त्यांचे राजीनामा घेत नव्हते, अशी टीकाही पटोलेंनी केली.

कुत्र्यांना पाहाताच चोराला फुटला घाम, भीतीनं दोन टप्प्यात परत केले चोरलेले पैसे

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधी बोलावे हा त्याचा अधिकर आहे. पण आपल्याला बोलका पीएम भेटला आहे ते बोलतात. विरोधी पक्ष म्हटले म्हणून बोलावे असं काही नाही', असा टोलाही पटोले यांनी फडणवीसांना लगावला.

'जे भ्रष्टाचाराच्या गुंतलेले ते आमच्यावर कसला आरोप करत आहे. वाटा भाजपावाल्यांनी कसे घेतात हे जनतेला माहिती आहे, काँग्रेस असले वाटा घेत नाही, असा टोलाही पटोलेंनी लगावला.

First published:
top videos