मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: Shreyas Iyer खेळणार नाही IPL 2021? वाचा काय आहेत लेटेस्ट Health Update

IND vs ENG: Shreyas Iyer खेळणार नाही IPL 2021? वाचा काय आहेत लेटेस्ट Health Update

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात (IND VS ENG first ODI) भारताने विजयी सलामी दिली पण भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात (IND VS ENG first ODI) भारताने विजयी सलामी दिली पण भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात (IND VS ENG first ODI) भारताने विजयी सलामी दिली पण भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

    पुणे, 24 मार्च: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात (IND VS ENG first ODI) विजयी सलामी देत तीन वन-डेंच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. संघातील सर्वच खेळाडूंनी या विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. भारताला हा विजय मिळाला पण दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर. यापैकी श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) डाव्या खांद्याला दुखापत झाल्यान तो 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मंगळवारी वन-डे सामन्यात दुखापतींबाबत काय घडलं ते जाणून घेऊया.

    भारतासाठी क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरचा डावा खांदा दुखावला. त्यानंतर स्कॅन केल्यावर डॉक्टरांनी त्याला उर्वरित सामन्यात खेळण्यास परवानगी दिली नाही. बीसीसीआयच्या (BCCI) म्हणण्यानुसार श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आगे. त्याचबरोबर फलंदाज रोहित शर्मालाही उजव्या कोपराला बॉलचा मार लागला.

    कशी झाली अय्यरला दुखापत?

    भारताच्या गोलंदाजीची 8 वी ओव्हर शार्दुल ठाकूर टाकत होता. मारलेला फटका आडवण्यासाठी श्रेयस अय्यरने त्याच्या डाव्या बाजूला डाइव्ह मारली आणि चेंडू अडवला. श्रेयसने संघासाठी काही धावा अडवल्याही पण नंतर मात्र तो डाव्या खांद्याला दुखापत झाल्याने विव्हळताना दिसला. भारतीय संघाच्या फिजिओथेरेपिस्टने मैदानात येऊन श्रेयसवर उपचार केले आणि नंतर त्याला मैदानातून बाहेर नेले. या दुखापतीनंतर त्याचा खांदा स्कॅन करण्यात आला.

    (हे वाचा-IND vs ENG : विराटचं अर्धशतक, आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड खिशात!)

    अय्यर मैदानाबाहेर गेल्यावर तरुण सलामीवीर शुभमन गिल त्याचा बदली फिल्डर म्हणून मैदानात आला. त्यानंतर बीसीसीआयनी अय्यरला स्कॅनिंगसाठी नेलं असून तो उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही हे जाहीर केलं.

    IPL मध्ये नाही दिसणार श्रेयस अय्यर?

    इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात फिल्डिंग करताना झालेल्या दुखापतीमुळे आगामी टी-20 (Indian Premier League 2021) आयपीएल क्रिकेट स्पर्धेमधील श्रेयसच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएल 2021 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून, श्रेयस दिल्ली कॅपिटल्स (Captain of Delhi Capitals team) संघाचं नेतृत्व करणार आहे. संघाला दिशा देणं आणि चांगली कामगिरी करणं या दोन्हींची जबाबदारी सांभाळण्यासाठी श्रेयस समर्थ असल्यानेच दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने ही जबाबदारी त्याच्या खांद्यांवर सोपवली आहे. पण आता दुखापतीमुळे तो ही जबाबदारी पार पाडू शकेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

    त्याचबरोबर नुकतंच लँकशायर क्रिकेट क्लबने आगामी रॉयल लंडन कप क्रिकेट स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरला करारबद्ध केलं आहे. त्यामुळे तिथल्या खेळण्याबाबतही संदिग्धता निर्माण झाली आहे.

    (हे वाचा- IND vs ENG : टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, महत्त्वाचे दोन खेळाडू मैदानातच घायाळ)

    श्रेयसबरोबर भारताचा महत्त्वाचा फलंदाज रोहित शर्मा देखील जखमी झाला. फलंदाजी करताना उजव्या हाताच्या कोपराला बॉलमुळे दुखापत झाल्याने रोहित शर्मा फिल्डिंगला मैदानात उतरू शकला नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडचा 148 किलोमीटर प्रतितास वेगाचा बॉल रोहितच्या उजव्या हाताच्या कोपराला लागला त्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला. इंग्लंडविरुदध सलामीला आलेल्या रोहितने शिखर धवनसोबत 64 धावांची भागीदारी केली त्यानंतर बेन स्टोक्सने त्याला 28 धावांवर बाद केलं.

    First published:
    top videos

      Tags: BCCI, Health, IND Vs ENG, IPL 2021, Shreyas iyer, Sports, Virat kohli, Wellness