• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • VIDEO: नवी मुंबईत दिवसाढवळ्या लुटमार, बंदुकीचा धाक दाखवत 70 लाखांच्या सोन्याने भरलेली बॅग केली लंपास

VIDEO: नवी मुंबईत दिवसाढवळ्या लुटमार, बंदुकीचा धाक दाखवत 70 लाखांच्या सोन्याने भरलेली बॅग केली लंपास

आपण सिनेमांमध्ये अनेकदा बुंदुकीचा धाक दाखवून लुटमार, अपहरण केल्याच्या घटना पाहतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात अशा घटना घडल्यावर धडकी भरल्याशिवाय राहत नाही. पनवेलमधील (Panvel Crime) जोशी आळीमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे.

 • Share this:
  नवी मुंबई, 05 ऑगस्ट: आपण सिनेमांमध्ये अनेकदा बुंदुकीचा धाक दाखवून लुटमार, अपहरण केल्याच्या घटना पाहतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात अशा घटना घडल्यावर धडकी भरल्याशिवाय राहत नाही. पनवेलमधील (Panvel Crime) जोशी आळीमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी असणाऱ्या गोकुळ सोसायटीजवळ दिवसाढवळ्या लुटमार झाल्याची घटना समोर आली आहे. गोकुळ सोसायटीतून सोन्याने भरलेली बॅग घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला दोन मोटार सायकलस्वारांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. पनवेल परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. ज्या व्यक्तीची लुटमार करण्यात आली ते दीपेश जैन एका दागिने पॉलिश करण्याच्या दुकानात काम करतात. काही भामट्यांनी त्यांच्याकडून सोन्याची बॅग लुटली आणि त्यांना जबरदस्त मारहाण केली आहे. दीपेश यांच्याकडे असलेल्या बॅगेत जवळपास 70 लाखांचं सोनं होतं. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणी पनवेल पोलिसांनी मोटारसायकवर असणाऱ्या दोघा अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांचा शोध सुरू आहे. हे वाचा-Watch Video:लोखंडी रॉड, काठ्यांनी व्यापाऱ्यावर हल्ला; हत्येचा प्रयत्न CCTVत कैद मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश जैन गंभीर जखमी झाले आहेत. जोशी आळीत असणाऱ्या गोकुळ सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर रावसाहेब कोळेकर यांचे दागिने पॉलिस करण्याचं दुकान आहे. त्याठिकाणी दीपेश जैन काम करतात. दुकानातून सोनं घेऊन ते बाहेर पडत होते, तेव्हा दोन बाईकस्वारांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली आणि सोन्याने भरलेली बॅग पळवून नेली. जखमी दीपेश यांनी चोरट्यांचा पाठलागही केला मात्र ते दोघेही फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेतला जात आहे. यापैकी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमधून दोन आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे वाचा-मैत्रिणीच्या सल्ल्याने पतीच्या हत्येची सुपारी; Ola चालकाच्या मृत्यूचं गुपित उघड दीपेश यांना उपचारासाठी पनवेलच्या पटेल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे एसीपी विनोद चव्हाण, एसीपी भागवत सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एन. कोल्हटकर,  गिरीधर गोरे, रवींद्र दौंडकर यांच्यासह पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: