जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / टेम्पो पार्किंग वरून वाद, उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

टेम्पो पार्किंग वरून वाद, उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

टेम्पो पार्किंग वरून वाद, उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

उल्हासनगर फर्निचर मार्केटमधील (Ulhasnagar Furniture Market) एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Cctv Camera) कैद झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 ऑगस्ट: उल्हासनगर फर्निचर मार्केटमधील (Ulhasnagar Furniture Market) एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Cctv Camera) कैद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व्यापाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा प्रकार कैद झाला असून पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे. उल्हासनगर फर्निचर मार्केट परिसरात दुकानासमोर टेम्पो पार्किंग वरून झालेल्या वादात व्यापाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

जाहिरात

कॅम्प नंबर 3 भागात मंगळवारी संध्याकाळी विजय माखिजा याच्या दुकानासमोर टेम्पो पार्क केली होती. मात्र आरोपी दर्शनसिंग याने त्या टेम्पोची हवा काढली. त्यावेळी विजय माखिजा आणि त्याचा भाऊ यांनी दर्शनसिंगला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये वाद झाले. त्या गोष्टीचा राग मनात धरून दर्शन सिंग याने आपल्या काही साथीदारांना बोलवून घेतले. यावेळी विजय माखिजा आणि अजयवर लोखंडी रॉड, काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अजय माखिजा हा गंभीर जखमी झाला असून मुंबईच्या रुग्णालयात त्याच्या उपचार सुरू आहेत. हेही वाचा: खेळता खेळता कुत्रीनं गिळली कुकरची शिटी, पुढे त्याचं झालं असं की… दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मध्यवर्ती पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात