• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • मैत्रिणीच्या सल्ल्याने पतीच्या हत्येची दिली सुपारी; Ola चालकाच्या मृत्यूचं गुपित उघड

मैत्रिणीच्या सल्ल्याने पतीच्या हत्येची दिली सुपारी; Ola चालकाच्या मृत्यूचं गुपित उघड

धक्कादायक बाब म्हणजे यासाठी पत्नीने आपले दागिने विकले आणि हे सर्व घडवून आणलं

  • Share this:
भिवंडी, 4 ऑगस्ट : तालुक्यातील मानकोली नाका येथे ओला कंपनीच्या कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना 1 ऑगष्ट रोजी उघडकीस आली होती. त्यानंतर पत्नीच्या तक्रारीवरुन  नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आता या हत्येचा धक्कादायक खुलासा झाला आहे. खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.  पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नसल्याच्या रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून दोघा जणांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी फिर्यादी (वय 32) तर प्रियकर नितेश गोवर्धन वाला  (वय 28), मैत्रीण प्रिया सुहास निकम (वय 32) असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे जण फरार असून त्यांचा तपास नारपोली पोलीस करीत आहेत. प्रभाकर याची पत्नी श्रुती हिचे नितेश याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. तिला प्रभाकरकडून घटस्फोट हवा होता आणि नितेश याच्यासोबत लग्न करावयाचे होते. मात्र पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकम हिला दिली. मैत्रिणीने पतीची हत्या करुन त्याचा काटा काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिनेच ओळखीचे दोन तरुण असल्याचं सांगितलं. पत्नी श्रुती हिने स्वतः कडील दागिने गहाण ठेवून पतीच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर पत्नी श्रुतीचा प्रियकर नितेश, मैत्रीण प्रिया यांनी कट रचून हत्या करणाऱ्यांनी 31 ऑगस्टच्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाईल करून रात्री दहा वाजता कार बुक केली व त्यानंतर प्रवासात मानकोली येथे त्या दोघा मारेकऱ्यांनी गळा आवळून हत्या करून शव कारमध्येच ठेवून पसार झाले होते. हे ही वाचा-'फ्रेंडशिप डे' दिवशी झालेला वाद चिघळला; नागपूरात 6जणांनी जीवलग मित्राचा केला गेम तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात फिर्याद देणारी पत्नी श्रुती हीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे ठाणे मुख्य गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात पत्नी श्रुती, प्रियकर नितेश व मैत्रीण यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्याचे आदेश दिले आहे. हत्या करणारे दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे हे त्या मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.
Published by:Meenal Gangurde
First published: