जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मराठा आरक्षणाच्या बैठकीचे निमंत्रणच मिळाले नाही, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप

मराठा आरक्षणाच्या बैठकीचे निमंत्रणच मिळाले नाही, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप

मराठा आरक्षणाच्या बैठकीचे निमंत्रणच मिळाले नाही, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप

विरोधकांना मराठा आरक्षण प्रकरणी चर्चेचं निमंत्रण म्हणजे बोलाचीच कढी बोलाचाच भात..

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढाई कशी करता येईल यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, या बैठकीचे अद्याप आपल्याला निमंत्रणच मिळाले नाही, असा दावा भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच जर निमंत्रण दिलेच नाहीतर बैठक रद्द होण्याचा विषयच नाही, असंही फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. परंतु, सरकारच्या घोषणेनंतर 36 तास उलटून गेल्यावरही मराठा आरक्षण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याशी सरकारचा कोणताही संपर्क नाही, अशी माहिती समोर आली आहे. सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याच्या डोळ्या देखत झाला बटाट्याचा चिखल! पाहा हे PHOTOS ‘मराठा आरक्षण प्रकरणी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना बैठकीचं अजूनही कोणतंही निमंत्रण दिलेलं नाही.  सरकारच्या एकाही मंत्र्याचा फडणवीस यांच्याशी बैठकीबद्दल अजूनही संपर्क केला नाही. त्यामुळे विरोधकांना मराठा आरक्षण प्रकरणी चर्चेचं निमंत्रण म्हणजे बोलाचीच कढी बोलाचाच भात?’ असं म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस यांना बैठकीला बोलावणार ही सरकारची फक्त घोषणाच होती. पण, अजूनही कोणताही संपर्क मात्र झाला नाही. दरम्यान, बिहार दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी मुंबईत  पोहचणार आहे. पण, बैठकीचे निमंत्रण नाही तर रद्द करण्याचा मुद्दा कुठे येतो, असा सवालच फडणवीस यांनी उपस्थितीत केला आहे. तर दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन मग मराठा आरक्षणासंदर्भात सरकार निर्णय घेणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती. Zomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान! तुमच्यावर आहे चीनची नजर विशेष म्हणजे, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहे.  ज्या मराठा संघटना आहे, जी लोकं आहे त्यांच्याशी बोलत आहे. अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांशी बोलणे सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सरकारसोबत आहोत अशी ग्वाही फडणवीसांनी दिली’ अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात