• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Zomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान! तुमच्यावर आहे चीनची नजर

Zomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान! तुमच्यावर आहे चीनची नजर

चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी (Chinese Communist Party) कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : एकीकडे पूर्व लडाखमध्ये तणावाचे वातावरण असताना चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी (Chinese Communist Party) कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील 24 लाख लोकांवर नजर ठेवत असल्याचे समोर आले आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद(President Ram Nath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi), विरोधी पक्षनेते सोनिया गांधी (Sonia Gandhi and their families), विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका ते उद्योगपतींचाही समावेश आहे. मात्र आता याचा थेट तुम्हालाही फटका बसू शकतो. हायब्रीड वॉरफेअर (Hybrid Warfare) आणि चीनच्या विस्तारासाठी डेटा वापरण्यात ही कंपनी सर्वोत्कृष्ट मानली जाते. झेन्हुआच्या डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडकडून या लोकांचे रिअल टाईम मॉनिटरींग केले जात आहे. या लोकांशी संबंधित प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवले जात आहे. ही कंपनी केवळ बड्या लोकांवरच नाही तर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमाटो आणि स्विगी या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांवरही चीन लक्ष ठेवून आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, उबर इंडियाचे ड्रायव्हर ऑपरेशन्सचे प्रमुख पवन वैश, जोमाटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल आणि स्विगीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन रेड्डी यांच्यावरही चीन नजर ठेवून आले. या कॅबिनेट मंत्र्यांवर नजर ठेवली जात आहे काही कॅबिनेट मंत्र्यांचा रिअल टाईम डेटादेखील चीनच्या नजरेत आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह तीन सैन्यदलांच्या किमान 15 माजी प्रमुखांचेही या यादीमध्ये नाव आहे. चीनला कशी मिळत आहे माहिती? रिपोर्टनुसार, इंडियन एक्सप्रेसने बिग डेटा टूल्सचा वापर करून झेन्हुआच्या या ऑपरेशनशी संबंधित मेटा डेटाची तपासणी केली, त्यानंतर ही माहिती उघडकीस आली. तपासणी दरम्यान भारतीय संस्थांशी संबंधित माहिती मोठ्या लॉग फाईल डंपमधून काढली गेली. डेटा लीक करणार्‍या कंपनीने त्याला ओव्हरसीझ इन्फॉरमेशन डेटाबेस असे नाव दिले. या डेटाबेसमध्ये एडवान्स लॅंगवेज, टार्गेटिंग आणि क्लासिफिकेशन टूल वापरले गेले आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युएई यांचीही नोंद आहे. 9 सप्टेंबरपासून बंद आहे डेटा चोरणारी कंपनी या रिपोर्टनुसास 1 सप्टेंबर रोजी इंडियन एक्सप्रेसने www.china-revival.com या वेबसाइटवर दिलेल्या ईमेल आयडीवर एक क्वेरी पाठविली होती, ज्यास अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 9 सप्टेंबर रोजी या कंपनीने आपली वेबसाइट पॅसिव्ह केली आहे. आता ही वेबसाइट उघडली जात नाही. या रिपोर्टनुसार, दिल्लीतील चिनी दूतावासाच्या एका सूत्राने म्हटले आहे की- 'चीन सरकारने कंपन्या किंवा व्यक्तींना चिनी सरकारच्या बॅकडोर किंवा स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करून इतर देशांकडून डेटा चोरी करण्यास सांगितले नाही.' दरम्यान, आता प्रश्न असा आहे की जर चिनी सरकारने असे म्हटले नाही तर मग चिनी सरकारने ओकेआयडीबी डेटा कशासाठी वापरला? असे प्रश्न समोर आले आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: