मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सरकार स्थिर! मग तुमचे मालक घरात 5 तास कशासाठी महायज्ञ करतायेत? नितेश राणेंचा राऊतांना सवाल

सरकार स्थिर! मग तुमचे मालक घरात 5 तास कशासाठी महायज्ञ करतायेत? नितेश राणेंचा राऊतांना सवाल

Nitesh Rane on Sanjay Raut महाविकास आघाडीचं सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर, राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात 5 तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत? असा सवाल त्यांनी विचारला.

Nitesh Rane on Sanjay Raut महाविकास आघाडीचं सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर, राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात 5 तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत? असा सवाल त्यांनी विचारला.

Nitesh Rane on Sanjay Raut महाविकास आघाडीचं सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर, राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात 5 तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत? असा सवाल त्यांनी विचारला.

मुंबई, 27 मे : महाविकास आघाडी सरकार सत्ते आल्यापासून सर्वाधिक चर्चा हे सरकार कधी पडणार याची होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. सरकारमधील (State Government) तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी सरकारमधील कुरबुरी वारंवार समोर येतात. सरकार स्थापनेत महत्त्वाचा वाटा असलेले संजय राऊत (Sanjay Raut) मात्र सरकार पडणं शक्य नाही म्हणत आहेत.  त्यांच्या या वक्तव्यावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांवर टीका केली आहे.

(वाचा-डॉक्टरांना राक्षस म्हणणे भोवले, कॉमेडियन सुनील पालची अंधेरी पोलीस ठाण्यात चौकशी)

मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांची शरद पवारांबरोबर बैठक झाली. त्यात काही नाराजी समोर आल्याच्या चर्चा होत्या. मात्र संजय राऊत यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हणत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका अशी प्रतिक्रिया दिली. सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये पाच वर्षे पूर्ण करणार. शरद पवार यांचे सरकारला आशिर्वाद आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं. मात्र त्यार नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

(वाचा-Emergency Landing तांत्रिक बिघाडामुळं पायलटनं थेट एक्स्प्रेस वेवर उतरवलं विमान)

महाविकास आघाडीचं सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर, राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात 5 तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत? असा सवाल त्यांनी विचारला ही राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी!! असा टोलाही राणे यांनी लगावला. संजय राऊत यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीची फाईल सापडत नसल्याने, राजभवनात भुताटकी झाली की काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला राणे यांनी अशा प्रकारे उत्तर दिलं.

कोरोनाच्या काळामध्ये सरकार पडण्याच्या चर्चांना काही काळ आराम मिळालेला होता. मात्र कोरोनातून सावरत असल्याचं चित्र समोर यायला सुरुवात होताच पुन्हा एकदा अशा चर्चा सुरू झाल्या. पंढरपूरमध्ये सरकारचा कार्यक्रम करण्याचं फडणवीसांचं वक्तव्य. त्याचा काही दिवसांपूर्वी केलेला पुनरुच्चार. चंद्रकांत पाटलांची वक्तव्ये ही बरंच काही सांगणारी आहे. त्यात गेल्या काही दिवसांत सरकारमधील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचेही आपसांत खटके उडत आहेत. त्यामुळं आता खरंच लवकरच सरकारचा कार्यक्रम होणार का? असा सवाल अनेकांसमोर आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra News, Nitesh rane, Sanjay raut, Uddhav tahckeray