ोमथुरा, 27 मे : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आगरा-नोयडा यमुना एक्सप्रेस वे (Yamuna Express way) वर दुपारी एक मोठा विमान अपघात (Aircraft crash) थोडक्यात टळला. गुरुवारी याठिकाणी एका खासगी कंपनीचे विमान (Private Aircraft) तांत्रिक अडचणीमुळे इमर्जम्सी लँडिंग (Emergency landing) करावं लागलं. यमुना एक्स्प्रेस वे वर माइल स्टोन 72 जवळ या विमानाचं इमर्जन्सी लँडींग झालं. पायलटच्या सतर्कतेमुळे याठिकाणी मोठा अपघात टळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती मिळाली आहे.
(वाचा-आदर पुनावाला यांचे देशासाठी मोठे योगदान, सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे सरकारला आदे)
एका खासगी कंपनीचे एक शिकाऊ विमान हरियाणाच्या नारनौमधून अलिगडला जात होते. प्रवासादरम्यान अचानक या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर त्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करणं अत्यंत गरजेचं होतं. त्यावेळी विमानाच्या पायलटनं अत्यंत विचारपूर्वक आणि सतर्कतेनं उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वे वर विमानाची लँडिंग केली. नौझिल परिसरात माईल स्टोन 72 जवळ या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालं.
(वाचा-'कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी प्रयत्न वेगात करा' राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आदेश)
एक्स्प्रेस वे वर अचानक विमानाचे लँडिंग झाल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटले. या परिसरातील आणि एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणारे या परिसरात जमा झाल्यानं बघ्यांची गर्दी याठिकाणी जमली होती. त्याचदरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसही घटनास्थळी पोहोचले. या विमानामध्ये पायलटसह आणखी दोन जण होतं. सर्वजण सुरक्षित असून यात कोणतीही हानी झाली नाही. पायलटच्या सतर्कनेनं थोडक्यात मोठा अपघाट टळल्याचं पाहायला मिळालं.
काही वर्षांपूर्वी, यमुना एक्सप्रेस वेवर हवाई दलाच्या काही विमानांचं लँडिंग करण्यात आलं होतं. युद्धाच्या दरम्यान किंवा इतर वेळी आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास पर्याय म्हणून याठिकाणी ही रंगीत तालीम करण्यात आली होती. अशा परिस्थितीती यमुना एक्सप्रेस वेचा वापर रनवे सारखा करता यावा म्हणून तो सराव करण्यात आला होता. पण गुरुवारी दुपारी अचानक एका खासगी विमानाला याठिकाणी असं लँडिंग करावं लागलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं वृत्त आहे. पण काही ठिकाणी विमानातील इंधन संपल्याचं वृत्तही माध्यमांमधून समोर आलं आहे. मात्र असा प्रकारे अचानक विमानाचं लँडिंग झाल्यानं परिसरातील नागरिक मात्र आवाक झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh news