मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /डॉक्टरांना राक्षस म्हणणे भोवले, कॉमेडियन सुनील पाल चौकशीसाठी अंधेरी पोलीस ठाण्यात

डॉक्टरांना राक्षस म्हणणे भोवले, कॉमेडियन सुनील पाल चौकशीसाठी अंधेरी पोलीस ठाण्यात

Sunil Pal Statement About Doctors सुनील पाल याच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यानं काही गंभीर आरोप केले होते. डॉक्टर देवाचं रुप असतात पण 90 टक्के डॉक्टरांनी राक्षसांच रुप धारण केलं आहे, असं सुनील पाल म्हणाला होता.

Sunil Pal Statement About Doctors सुनील पाल याच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यानं काही गंभीर आरोप केले होते. डॉक्टर देवाचं रुप असतात पण 90 टक्के डॉक्टरांनी राक्षसांच रुप धारण केलं आहे, असं सुनील पाल म्हणाला होता.

Sunil Pal Statement About Doctors सुनील पाल याच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यानं काही गंभीर आरोप केले होते. डॉक्टर देवाचं रुप असतात पण 90 टक्के डॉक्टरांनी राक्षसांच रुप धारण केलं आहे, असं सुनील पाल म्हणाला होता.

मुंबई, 27 मे: कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळामध्येही अनेक अडचणींचा सामना करून डॉक्टर (Doctors) त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र तरीही डॉक्टरांबाबत विविध आक्षेपार्ह वक्तव्येही (Controversial statement) समोर येत आहेत. त्यात कॉमेडीयन सुनील पालनंदेखिल (Comedian Sunil Pal) असंच एक वक्तव्य केल्याचं समोर आलं. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हे (Case Against Sunil Pal) दाखल केले. गुरुवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुनील पालला पोलिसांनी बोलावलं होतं.

(वाचा-महाविकास आघाडीत वाद पेटला, काँग्रेस मंत्र्याचा अजित पवारांवर थेट आरोप)

डॉक्टरांच्या विरोधात होणाऱ्या वक्तव्यांच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण प्रचंड तापलेलं आहे. रामदेव बाबा विरुद्ध डॉक्टरांचा वाद पेटलेला आहे. त्यातच कॉमेडीयन सुनील पाल याचंही एक आक्षेपार्ह वक्तव्य नुकतंच समोर आलं. कोरोनाच्या नावाखाली डॉक्टर लूट करत असल्याचा आशय असलेल्या या व्हिडिओमध्ये सुनील पालनं डॉक्टरांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. यानंतर असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंटच्या अध्यक्षा डॉ. सुश्मिता भटनागर यांनी सुनिल पाल याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून सुनील पालवर कलम 505 आणि 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुरुवारी सुनील पालला चौकशीसाठी बोलावलं.

(वाचा-मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी)

सुनील पाल यानं चौकशीसाठी जात असल्याची माहिती स्वतः एका व्हिडिओद्वारे दिली. तब्येत ठीक नसली तरी पोलिसांनी बोलावल्यामुळं चौकशीसाठी जात असल्याचं सुनील पाल म्हणाला. कायद्याचा सन्मान करत असल्यामुळं पोलिसांनी बोलावलं तर जात आहे. सर्वकाही ठिक होईल यासाठी प्रार्थना करा, असंही सुनील पाल यानं म्हटलं आहे.

सुनील पाल याच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यानं काही गंभीर आरोप केले होते. डॉक्टर देवाचं रुप असतात पण 90 टक्के डॉक्टरांनी राक्षसांच रुप धारण केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकांना त्रास दिला जात आहे. औषध, बेड उलब्ध नसल्याचं सांगत लोकांना घाबरवलं जात आहे, असं सुनील यानं व्हिडिओत म्हटलं होतं. लोकांना बळजबरी कोरोना झाल्याचं सांगून दाखल केलं जात आहे. मृत्यूनंतरही उपचार करत बिल बनवलं जात असून त्यांच्या अवयवांची तस्करी केली जात असल्याचा गंभीर आरोपही सुनील पालनं केला होता.

दरम्यान सुनील पाल यानं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावरून वाद झाल्यानंतर माफीही मागितली होती. जर माझ्या वक्तव्यानं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं सुनील पाल म्हणाला होता. त्याचवेळी मी 90 टक्के डॉक्टरांबाबत बोललो. डॉक्टरांना जर ते त्या 90 टक्क्यांमध्ये आहेत, असं वाटत असेल तर मी काही करू शकत नाही, असंही सुनील पालनं म्हटलंय.

एकूणच वैद्यकीय संघटनांनी डॉक्टरांच्या विरोधातील वक्तव्यांची आता गांभीर्याने दखल घ्यायला सुरुवात केली आहे. डॉक्टर विरुद्ध रामदेव बाबा वाद सुरू असतानाच आता हा नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळं कॉमेडीयन सुनील पाल या प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकणार का, हे पाहावं लागेल.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Mumbai News