जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Sachin Vaze: धमकीचं पत्र आणि जिलेटीनच्या कांड्या ठेवणारा अखेर सापडला, NIA तपासात उलगडा

Sachin Vaze: धमकीचं पत्र आणि जिलेटीनच्या कांड्या ठेवणारा अखेर सापडला, NIA तपासात उलगडा

Sachin Vaze: धमकीचं पत्र आणि जिलेटीनच्या कांड्या ठेवणारा अखेर सापडला, NIA तपासात उलगडा

Sachin Vaze : एखाद्या सस्पेन्स चित्रपटाप्रमाणे सचिन वाझे प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. सचिन वाझे याने हा कट इतका पद्धतशीरपणे रचला होता की, चित्रपटाची कथा लिहीण्याऱ्याही आश्चर्य वाटेल

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च: एखाद्या सस्पेन्स चित्रपटाप्रमाणे मुंबईतील स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत.  25 फेब्रुवारीच्या रात्री सचिन वाझे यांनीच हिरव्या रंगाच्या गाडीत धमकीचं पत्र आणि जिलेटीनच्या काड्या ठेवल्याचं समोर आलं आहे. एनआयएच्या तपासात (NIA Investigation) ही माहिती उघड झाली आहे. हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझेच्या खासगी ड्रायव्हरने मायकल रोडवर पार्क केली होती. 25 फेब्रुवारीच्या रात्री मायकल रोडवर पार्क केलेल्या गाडीत धमकीचं पत्र आणि जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यासाठी सचिन वाझे ओळख लपवत कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून गेला होता. 17 फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड ऐरोली येथे गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगत मनसुख हिरेन यांनी गाडी तिथेच सोडली आणि गाडीची चावी पुढे जाऊन सचिन वाझे याला दिली. त्यानंतर वाझेने ती गाडी खासगी ड्रायव्हरला घेऊन जाण्यास सांगितले. ड्रायव्हरने ती गाडी ठाणे येथील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पार्क केली. त्यानंतर 19 फेब्रुवारीला ड्रायव्हरला पुन्हा ती गाडी मुंबई पोलीस आयुक्तालयात पार्क करण्यास सांगितले. मोठी बातमी, RTPCR चाचणी आता केवळ 500 रुपयात, राज्य सरकारची घोषणा कुणाला संशय येऊ नये म्हणून रात्री ती गाडी घेऊन ड्रायव्हरला ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. त्यानंतर थेट 24 फेब्रुवारीला खासगी ड्रायव्हर ही गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला आणि गाडी मायकल रोडवर पार्क केली. या गाडीच्या मागे वाझे पांढऱ्या रंगाची इनोव्हा घेऊन होता. स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर खासगी ड्रायव्हर इनोव्हा गाडीत बसला आणि मुलुंड टोलनाका पार करत ठाण्याच्या दिशेने निघून गेला. केवळ 20 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई काही वेळानंतर इनोव्हा गाडीची नंबर प्लेट बदलून वाझे पुन्हा मुंबईत आला. यावेळेस त्याने स्वत:ची ओळख लपवत सोबत आणलेले धमकीचे पत्र आणि जिलेटीनच्या कांड्या स्कॉर्पिओ गाडीत ठेवल्या आणि निघून गेला. गाडीची बनावट नंबर प्लेट, साकेत सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिठीत नदीत फेकून दिल्या.

Drugs case : अटकेच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेता एजाज खानबाबत NCB ने केला मोठा खुलासा

एनआयएने चौकशीत या सर्व बाबी उघड केल्या आणि मिठी नदीत फेकून दिलेले पुरावे हस्तगत केले. याप्रकरणी एनआयए आणखी तपास करत आणखी धक्कादायक माहिती समोर येईल असं सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात