जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी, RTPCR चाचणी आता केवळ 500 रुपयात, राज्य सरकारची घोषणा

मोठी बातमी, RTPCR चाचणी आता केवळ 500 रुपयात, राज्य सरकारची घोषणा

प्रायमरी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होत आहे

प्रायमरी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होत आहे

आरटीपीसीआर चाचणीसोबतच (RTPCR Test) रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या (Rapid antigen antibody testing) चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च : राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरले आहे.  खासगी प्रयोगशाळांमध्ये (LAB) करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे सुधारीत दर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी (RTPCR Test) आता 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे (Rapid antigen antibody testing) दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली आहे. आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. राज्यसरकार ने गेल्या वर्षापासून किमान 5 ते 6 वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असेल.   शासन निर्णयानुसार, आता कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील. बाबो! चुकीचं स्पेलिंग असलेल्या ‘या’ ट्विटची किंमत तब्बल 18 कोटी, काय आहे कारण… रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे. Raigad News:रोहा मार्गावर मृत्यूतांडव, भरधाव ट्रकने 8 जणांचा चिरडले, 4 जागीच ठार आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात