केवळ 20 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई

केवळ 20 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई

अतिशय कमी गुंतवणुकीत या झाडाचा व्यवसाय करता येतो. अवघे 20 हजार रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मागणी आणि नफा वाढल्यावर व्यवसाय वाढवू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : बोन्साय प्लँटला (Bonsai Plant) गुडलक म्हणजे शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र यातही याचं महत्त्व आहे, त्यामुळे आजकाल भेट देण्यासाठी, घरात सजावटीसाठी बोन्साय प्लँटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. केंद्रसरकारही (Central Government) याच्या लागवडीसाठी आर्थिक मदत देते. अतिशय कमी गुंतवणुकीत या झाडाचा व्यवसाय करता येतो. अवघे 20 हजार रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मागणी आणि नफा वाढल्यावर व्यवसाय वाढवू शकता.

या झाडाची किंमत किती असते?

आजकाल लकी प्लँट म्हणून हे बोन्साय प्लँट मोठ्या प्रमाणात वापरले जाते. घरी, ऑफीसमध्येही याचा सजावटीसाठी वापर केला जातो. त्यामुळे याला मागणी मोठी आहे. सध्या बाजारात याची किंमत 200 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत आहे. याशिवाय बोन्सायप्रेमी लोक यासाठी तुम्ही मागाल ती किंमत द्यायला तयार असतात.

(वाचा - दिलासा! आधार-पॅन लिंक करण्याची मुदत वाढवली; पाहा काय आहे शेवटची तारीख)

दोन प्रकारे व्यवसाय करू शकता -

अगदी कमी भांडवल वापरून हा व्यवसाय करता येतो, मात्र त्यात जम बसायला थोडा वेळ लागतो. कारण बोन्साय प्लँट तयार होण्यासाठी दोन ते पाच वर्षांचा वेळ लागतो. किंवा मग तुम्ही नर्सरीतून तयार झाडं आणून ती 30 ते 50 टक्के नफा घेऊन विकू शकता.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य -

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वच्छ पाणी, वाळू, मातीची किंवा काचेची भांडी, जमीन किंवा छत, काचेच्या गोट्या, स्प्रे बॉटल, शेडसाठी जाळी, पातळ तार, इत्यादी साहित्याची आवश्यकता आहे. अगदी छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूकही पुरेशी ठरते. प्रमाण वाढवलं तर 20 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

(वाचा - LPG Gas Cylinder स्वस्त झाला, 1 एप्रिलपासून लागू होणार नवे दर)

सरकार देते इतकी आर्थिक मदत -

तीन वर्षात साधारण एका झाडासाठी 240 रुपये खर्च येईल, त्यापैकी 120 रुपये सरकार देते. इशान्य राज्ये वगळता सर्वत्र या बोन्साय प्लँटच्या शेतीसाठी सरकार 50 टक्के भांडवल खर्च देते, तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला 50 टक्के गुंतवणूक करावी लागते. सरकारकडून मिळणाऱ्या या 50 टक्के मदतीत केंद्रसरकारचा हिस्सा 60 टक्के आणि राज्य सरकारचा हिस्सा 40 टक्के असतो. ईशान्येकडील राज्यांमध्ये या व्यवसायासाठी सरकार 60 टक्के मदत देते, तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला 40 टक्के गुंतवणूक करावी लागते. सरकारच्या 60 टक्के मदतीत 90 टक्के वाटा केंद्र सरकारचा, तर 10 टक्के वाटा राज्य सरकारचा असतो. जिल्ह्याचे नोडल अधिकरी या योजनेबाबत सर्व माहिती देऊ शकतात.

(वाचा - केवळ 15000 रुपयांत सुरू करा तुळशीची शेती; 3 लाखांपर्यंत होईल कमाई)

3.5 लाखांची कमाई शक्य -

आवश्यकता आणि झाडाच्या जातीनुसार एक हेक्टर क्षेत्रात साधारण 1500 ते 2500 झाडं लावता येतात. 3 बाय 2.5 मीटर अंतरावर एक झाड या हिशेबाने एक हेक्टर क्षेत्रावर 1500 झाडं लावता येतात. दोन झाडांच्यामध्ये दुसरं पीकही घेता येतं. चार वर्षानंतर 3 ते 3.5 लाख रुपये कमाई होऊ लागेल. दर वर्षी झाडं लावण्याची गरज पडत नाही. कारण 40 वर्ष हे झाड टिकतं. दुसरं पीक घेण्यासह शेताच्या बांधावर चार बाय चार अंतरावर एक या प्रमाणे एक बांबूचं झाड लावल्यास त्यातून चार वर्षात उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. साधारण 30 हजार रुपये कमाई होऊ शकते. दोन पिकं घेता येत असल्यानं अतिरिक्त उत्पन्नाचीही सोय होते आणि पर्यायानं जोखीम कमी होते.

First published: March 31, 2021, 9:49 PM IST

ताज्या बातम्या