मुंबई, 31 मार्च : ड्रग्ज पुरवठा (Drugs case) करणाऱ्या बटाटा गँगशी (Batata gang) संबंध असल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला (Actor Eijaz Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी अटक केली. त्याची आठ तास चौकशी झाली आणि या चौकशीत बरीच माहिती उघड झाली आहे. एजाजला आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी एनसीबीने एजाजबाबत मोठे खुलासे केले आहेत. एजाजचा बटाटा गँगशी संबंध असून त्याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत, असं एनसीबीने सांगितलं आहे. एजाज खान हा शादाब बटाटा आणि शाहरुख खान या दोन्ही अमली पदार्थ तस्करांसह व्हॉट्सअॅप काॅल आणि व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून संपर्कात होता. एजाज या दोघांशी ड्रग्जबाबत चॅटिंग तसंच वाॅईस चॅट करत होता, हे पुरावे NCB च्या हाती लागले आहेत. त्यामुळे एजाजला अटक करण्यात आली आहे, असं एनसीबीने सांगितलं. एजाजवर याआधी देखील अमली पदार्थ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बटाटा गॅंगशी त्याचे जवळचे संबंध असून त्यांच्यासोबत मिळून तो अंमली पदार्थांची तस्करी करतो याबाबत आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत जे आम्ही लवकरच न्यायालयात सादर करणार आहोत, असं एनसीबीनं सांगितलं आहे. हे वाचा - शूटिंगला परतलेल्या अनुष्का शर्माचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल Alprazolam हे प्रतिबंधित अंमली पदार्थ अभिनेता एजाज खानकडून NCB ने जप्त केलेत. आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याने ती नैराश्य असते त्यामुळे हे प्रतिबंधित अंमली पदार्थ घेतल्याने तिला झोप येण्यास मदत होते असा दावा अटकेच्या वेळेस अभिनेता एजाज खानने केला आहे. ड्रग्ज प्रकरणात आपला काहीही सहभाग नाही, असा कांगावा एजाजने केला आहे. डोंगरीतील अमली पदार्थ तस्कर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटा आणि शाहरुख खान या दोन अमली पदार्थ तस्करांना नुकतीच अटक करण्यात आली होती. या दोघांच्या झालेल्या चौकशी दरम्यान मुंबई शहरात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी सुरू असलेल्या या टोळीमध्ये अभिनेता एजाज खानचाही समावेश असल्याचं उघड झाल्यानंतर त्याला अटक झालेली आहे. आता त्याला दोन दिवसांची NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. हे वाचा - ‘सलमान खाननं दिला धोका?’ एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा खळबळजनक खुलासा…. आरीफ भूजवाला, चिंकू पठाण आणि हुसैन तेलवाला यांच्या NCB ने मुसक्या आवळल्यानंतर डोंगरीतील दाऊदचं ड्रग्स रॅकेट संपुष्टात आलं असं बोललं जात होतं. पण नुकतीच NCB ने डोंगरीतील बटाटा गॅंगच्या तस्करांना पकडल्यानंतर डोंगरीत अजूनही अंमली पदार्थांची तस्करी सुरुच असल्याचं समोर आलं, इतकंच नाही तर या बटाटा गॅंगचे बाॅलिवूड कनेक्शन उघड झाल्यानंतर NCB ने अभिनेता एजाज खानला देखील अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.