जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : शरद पवार झाले अलर्ट, राष्ट्रवादीच्या शिलेदारांची बोलावली बैठक

BREAKING : शरद पवार झाले अलर्ट, राष्ट्रवादीच्या शिलेदारांची बोलावली बैठक

BREAKING : शरद पवार झाले अलर्ट, राष्ट्रवादीच्या शिलेदारांची बोलावली बैठक

सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना-राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार बैठकीत घेणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च :  महाआघाडी सरकारमधील (MVA Goverment) वादग्रस्त प्रकरण आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. दोन सत्रात ही बैठक होणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan case) प्रकरणापासून ते मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze arrest) अटकेपर्यंत या ना त्या मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबई महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार आजच्या बैठकीत घेणार आहेत. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात ही बैठक होणार आहे. मुलाला बेदखल करत हत्तीच्या नावावर केली 5 कोटीची संपत्ती, अतूट नात्याची अनोखी कथा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरुणी बलात्काराचा आरोप केला होता आणि या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केला होता. पण, तरुणी गुन्हा मागे घेतल्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला. पण, हे प्रकरण ताजे असताना पुण्यात पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले. समोर आलेल्या 12 ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांना अखेर पदावरून पायउतार व्हावे लागले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपने आणखी आक्रमक होत कायद्या आणि सुरक्षेच्या मुद्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मुंबईत सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक खुलासे केले. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहण्यास मिळाली होती. अन्वय नाईक प्रकरणी वक्तव्य केल्यामुळे फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात विशेष हक्कभंग आणला. झुंज अपयशी, कोरोनाला मात देणाऱ्या सांगलीतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन अधिवेशन संपल्यानंतरही वाद सुरूच होता. मुंबई स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी झाल्याशिवाय कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका घेत सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहे का? असे विधान केले होते. मात्र, एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळेच आता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात