Home /News /mumbai /

आधी म्हणायचं 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?', आता काढत आहे 'महाराष्ट्र बचाव'चे गळे

आधी म्हणायचं 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?', आता काढत आहे 'महाराष्ट्र बचाव'चे गळे

कोरोना विरोधातील लढाई ठोकरे सरकार गांभीर्यानं घेत नसून त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आला आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.

    मुंबई, 22 मे: भाजपक्षांतर्फे आज (22 मे) महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. कोरोना विरोधातील लढाई ठोकरे सरकार गांभीर्यानं घेत नसून त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आला आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. आधी म्हणायचं 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' आणि आता 'महाराष्ट्र बचाव'चे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचं, अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. हेही वाचा.. आषाढी वारी! कोरोनामुळे मानाच्या सातपैकी चार पालख्यांनी घेतला मोठा निर्णय अरे किती हिणवणार? रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कोरोना योद्धांचा आंदोलनाच्या नावाने अपमान तरी करू नका. राज्याचा एवढाच कळवळा आहे तर संकटात तरी एकदिलाने काम करत #महाराष्ट्रघडवूया!, असं आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे. भारतीय जनता पक्षांतर्फे आज महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या आवारातच काळ्या फिती लावून आणि सरकारला आवाहन करणारे फलक लावून आंदोलन करण्याचं आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे. या आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरात आंदोलन करणार आहेत. हेही वाचा.. मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर शिवसेना मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा देवेंद्र फडणवीस असं दिलं प्रत्युत्तर.. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार हे कोरोनाच्या आपत्तीत निष्क्रिय ठरले आहे, अशी तक्रार केली होती. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिताना एक पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही लिहावे, असा खोचक सल्ला फडणवीस यांनी दिला होता. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'शरद पवारांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं, त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल', असा पलटवार रोहित पवारांनी फडणवीस यांच्यावर केला. तर फडणवीसांनी राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: BJP, Rohit pawar

    पुढील बातम्या