आषाढी वारी! कोरोनामुळे मानाच्या सातपैकी चार पालख्यांनी घेतला मोठा निर्णय

आषाढी वारी! कोरोनामुळे मानाच्या सातपैकी चार पालख्यांनी घेतला मोठा निर्णय

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदा आषाढी वारी होणार की नाही, असा संभ्रम वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

  • Share this:

पुणे, 22 मे: कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदा आषाढी वारी होणार की नाही, असा संभ्रम वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तो म्हणजे मानाच्या सातपैकी चार पालख्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा.. मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर शिवसेना मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिलेली माहिती अशी की, सात मानाच्या पालख्यांपैकी पैठणची एकनाथ महाराज पालखी, त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज पालखी, जळगावच्या मुक्ताईनगरची मुक्ताईनगर पालखी आणि सासवडची सोपानकाका पालखी यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेहमीचा पालखी सोहळा रद्द करताना परंपरा चालू ठेवण्यासाठी काही पर्यायही या पालख्यांनी सरकारला दिले आहेत. त्यापैकी सरकार जी परवानगी देईल, त्यानुसार पालखी सोहळा करण्याची तयारी असल्याचे रघुनाथ महाराज गोसावी यांनी म्हटलं आहे.

प्रस्थानाच्या दिवशी सरकारच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. म्हणजे पैठणमध्ये नाथांच्या जुन्या वाड्यापासून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल आणि दशमीपर्यंत तिथेच मुक्काम करेल. दशमीला तीस मानकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, आळंदी आणि देहू संस्थाननेही मोजक्याच वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला पालखी नेण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पालखी प्रमुख आणि पालखीशी संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वारकरी प्रतिनिधींशी संवाद साधला होता. वारीची असंख्य वर्षांची परंपरा खंडित होणार नाही, अशा विश्वास त्यांनी दिला होता. याबाबत सरकारशी चर्चा होणार असून या महिनाअखेरीस म्हणजे 29 मे रोजी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा.. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राच्या मदतीला आला उत्तर प्रदेश

दुसरीकडे, किमान पाच वारकऱ्यांना सरकारने परवानगी दिली तर पायी सोहळा पूर्ण करू अन्यथा दशमीला पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. परवानगी मिळाली तर पैठण ते पंढरपूर हा प्रवास मानाच्या पादुकांसह वेगवेगळ्या वाहनांनी करण्यात येईल. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित होणार नाही. परवानगी मिळाली तर पालखी सोहळा पाच लोकांसह पूर्ण करण्यात येईल.

First published: May 22, 2020, 9:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading