Home /News /mumbai /

Mumbai Drug Case: BJP नेत्याचा तो मेहुणा कोण? , नवाब मलिकांनी केला मोठा खुलासा

Mumbai Drug Case: BJP नेत्याचा तो मेहुणा कोण? , नवाब मलिकांनी केला मोठा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. Cordelia क्रूझवर एनसीबीने धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईसंदर्भात मलिकांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

    मुंबई, 09 ऑक्टोबर:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर एनसीबीने धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचाही समावेश आहे. दरम्यान एनसीबीच्या (NCB) कारवाईवर नवाब मलिकांनी काही गंभीर आरोप केलेत. आजही पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी मोठा खुलासा केला आहे. समीर वानखेडेंच्या कारवाईवर मलिकांचं प्रश्नचिन्ह  एनसीबीनं 8 लोकांना ताब्यात घेतलं असं सांगितलं होतं. पण एनसीबीनं 11 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिघांना सोडण्यात आलं. त्यात रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. रिषभ सचदेवा यांचा भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. रिषभ सचदेवा, हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारती यांचा मेहुणा आहे. रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहेत, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलं आहे. रिषभ सचदेवा यांना 2 तासात सोडण्यात आलं. जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा यांचं नाव reflect झालं होतं. यांच्याच बोलण्यावरून आर्यन आला होता, असा खुलासाही मलिकांनी केला आहे. या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे ncb ला सांगावं लागेल, असा सवाल मलिकांनी एनसीबीला विचारलं आहे. आम्ही मागणी करयोय की वानखेडे यांनी याचा तात्काळ खुलासा करावा, असं मलिक म्हणालेत. हेही वाचा- IPL 2021: 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदा काय चुकलं? रोहितनं दिलं उत्तर  एनसीबीच्या चुकीच्या कामांची माहिती तुमच्यासमोर आणली होती. ज्या दिवशी छापमारी केली त्या दिवशी समीर वानखेडे ने 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. एक जबाबदार अधिकारी असं कसं म्हणू शकतो. तीन लोकांना सोडून देण्यात आलं का??, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. समीर वानखेडे यांचे फोन डिटेल्स काढावे रिषभ सचदेवा यांच्या बाबांच्या फोनवर महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचा फोनवर वानखेडे यांचं बोलणं झालं, असा आमचा आरोप असल्याचं मलिकांनी म्हटलं आहे. कालच्या पत्रकार परिषदेतील गौप्यस्फोट या कारवाई दरम्यान भाजप नेत्याच्या एक मेहुण्याला सोडून दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता .क्रूझवरील ड्रग्स पार्टीतून ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन जणांना सोडण्यातं आलं असं म्हणत त्यात भाजप नेत्याच्या एका मेहुण्याला सोडून देण्यात आल्याचा नवाब मलिकांनी  केला होता. भाजप नेत्याचा मेहुणा कारवाईतून कसा सुटला? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला होता. त्याचाच आज खुलासा मलिकांनी केला आहे. हेही वाचा- आगामी BMC निवडणुकीसाठी संजय राऊतांकडून शिवसेनेची भूमिका स्पष्ट बुधवारच्या पत्रकार परिषदेतही खळबळजनक खुलासा नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केला. त्यानंतर तातडीने एनसीबीने सुद्धा पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळले. त्यानंतर आता राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या संदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं, "एनसीबीच्या सुरु असलेल्या चुकीच्या कारवाईच्या संदर्भात मला माहिती उघड करायची आहे आणि त्यासाठी माहिती गोळा करायला थोडा वेळ लागणार आहे. यााठी पत्रकार परिषद शुक्रवार ऐवजी शनिवारी आयोजित केली आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद होईल." आता नवाब मलिक कुठला नवा गौप्यस्फोट करतात हे पहावं लागेल. हेही वाचा- Video: कोरोना नियमांचा फज्जा! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण एनसीबीवर गंभीर आरोप नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी म्हटलं होतं, शनिवारी एनसीबी (NCB) ने CISF कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून गौप्यस्फोट केला आहे. 'आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Nawab malik, NCB, NCP

    पुढील बातम्या