मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदा काय चुकलं? रोहितनं दिलं उत्तर

IPL 2021: 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदा काय चुकलं? रोहितनं दिलं उत्तर

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदा प्ले ऑफ (IPL 2021 Playoffs) गाठण्यात अपयश आले.

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदा प्ले ऑफ (IPL 2021 Playoffs) गाठण्यात अपयश आले.

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदा प्ले ऑफ (IPL 2021 Playoffs) गाठण्यात अपयश आले.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 ऑक्टोबर : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदा प्ले ऑफ (IPL 2021 Playoffs) गाठण्यात अपयश आले. मुंबईनं शेवटच्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 42 रननं हरवले. पण हा विजय 'प्ले ऑफ' गाठण्यासाठा पुरेसा ठरला नाही. मुंबईला हैदराबादला 65 पेक्षा कमी रनमध्ये रोखणे आवश्यक होते. पण हैदराबादनं 8 आऊट 193 रन केले. यंदा सलग तिसरे विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानं उतरलेल्या मुंबई इंडियन्सचं विजेतेपदाचं स्वप्न यंदा पूर्ण झालं नाही. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) यंदा टीमचं काय चुकलं हे सांगितलं आहे. हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर रोहित म्हणाला की, 'आम्ही जे साध्य केलं त्याचा अभिमान आहे. दिल्लीमध्ये मॅच जिंकल्यानंतर आम्हाला सूर गवसला होता. पण त्यानंतर ब्रेक झाला. इथं आल्यानंतर आम्ही टीम म्हणून एकत्र प्रयत्न करण्यात अपयशी ठरलो. आजच्या विजयाचा आनंद आहे. आम्ही या मॅचमध्ये सर्वस्व पणाला लावले होते. आमच्या फॅन्सनाही हा खेळ आवडला असेल, अशी माझी खात्री आहे. मुंबईसारख्या फ्रँचायझीकडून खेळताना तुमच्याकडून नेहमी चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाते. मी याला दबाव न म्हणता अपेक्षा असं म्हणेल.' असं रोहितनं सांगितलं. playoffs मध्ये पोहचण्याचे Mumbai Indiansचे स्वप्न भंगले केन विल्यमसन जखमी असल्यानं हैदराबादच्या टीमचं नेतृत्त्व करणाऱ्या मनिष पांडेनं सांगितलं की, 'मुंबई या मॅचमध्ये सर्वस्व पणाला लावेल याची आम्हाला अपेक्षा होती. आम्ही आणखी चांगली बॉलिंग करु शकलो असतो. आमच्या फास्ट बॉलर्सनी काही अतिरिक्त रन दिले. त्याचा आम्हाला फटका बसला. IPL 2021: मुंबईच्या विजयानं विराटला दिलासा, इतर टीमची मात्र उडाली झोप! सनरायझर्स हैदराबादची (SRH) टीम या स्पर्धेत तीन विजयासह शेवटच्या क्रमांकावर राहिली.  टीमला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याचं मनिषनं मान्य केलं. 'आम्ही फक्त 3 मॅच जिंकू शकलो. आमच्या टीममध्ये बरेच बदल झाले पण एकही बदल यशस्वी ठरला नाही. चेन्नईतील सुरुवातीच्या मॅचमध्ये आम्हाला संघर्ष करावा लागला. दुसऱ्या हाफमध्ये आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं त्यात यशस्वी झालो नाही. काही खेळाडूंनी वैयक्तित कामगिरी चांगली केली, पण टीम म्हणून आम्ही चांगला खेळ करु शकलो नाही.'
First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma

पुढील बातम्या