मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'...तर वाझेंचा मनसुख हिरेन होईल', भीती व्यक्त करत राणा दाम्पत्याने NIA कडे केली सुरक्षेची मागणी

'...तर वाझेंचा मनसुख हिरेन होईल', भीती व्यक्त करत राणा दाम्पत्याने NIA कडे केली सुरक्षेची मागणी

एकीकडे सचिन वाझे यांच्यावर टीका होत असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी वाझेंना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

एकीकडे सचिन वाझे यांच्यावर टीका होत असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी वाझेंना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

एकीकडे सचिन वाझे यांच्यावर टीका होत असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी वाझेंना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

अमरावती, 19  मार्च: मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren Death Case) प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. एटीएस सचिन वाझेंचा ताबा मागणार असून आज (शुक्रवारी) ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. एटीएसकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांनी वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान एकीकडे वाझे यांच्यावर टीका होत असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी वाझेंना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली झाली असली तरी या हत्येचे धागेदोरे हे महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे असल्याने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा कोणत्याही क्षणी मनसुख हिरेन होऊ शकतो. त्यामुळे  NIA ने सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलिसांपासून दूर ठेवले पाहिजे. त्याचप्रकारे NIA ने वाझेंना  सुरक्षा द्यावी अशी मागणी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.

(हे वाचा-आणखी एक मंत्री वादात; सरकारी बंगल्यावरील कोट्यवधींच्या खर्चामुळे भाजप आक्रमक)

यावेळी रवी राणा असं म्हणाले की, 'केवळ मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बाजूला करून हे प्रकरण संपणारं नाही आहे, याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभोवती फिरत आहेत. हिरेन यांच्य सुरक्षेसंदर्भात वारंवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागण करत होते, पण त्यांना सुरक्षा दिली नाही. शेवटी त्यांचा खून झाला. यानंतर सचिन वाझेंचं प्लॅनिंग सर्वांना दिसंल. वाझेंच्या प्लॅनिंगमागे कोण होतं हे लवकरच बाहेर येईल. त्यामुळे सचिन वाझेंचा हिरेन होऊ नये, त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले पाहिजे. NIA ने त्याला संरक्षण दिले पाहिजे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार आहे.'

तर नवनीत राणा म्हणाल्या की, 'जर NIA सचिन वाझेला मुंबई पोलिसांपासून दूर नाही ठेवले तर त्याचा मनसुख हिरेन व्हायला वेळ लागणार नाही. येणाऱ्या काळातील महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची नावं, जी मातोश्रीपर्यंत जातील, ती नावं या चौकशीत बाहेर येतील.'

(हे वाचा-'OMG यांचे गुडघे दिसतायंत..', प्रियांका गांधींनी का पोस्ट केला मोदींचा हा PHOTO?)

राणा दाम्पत्याने असे देखील म्हटले आहे की, सचिन वाझे यांनी NIA ला जी माहिती दिली त्यामुळे राज्य सरकार आणि 'मातोश्री' अडचणीत येऊ शकते, यामुळे सचिन वाझे यांच्या जीविताला धोका असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai police, Navneet Rana, Ravi rana, Sachin vaze, Uddhav thackarey, महाराष्ट्र