मराठी बातम्या /बातम्या /देश /'OMG यांचे गुडघे दिसतायंत..', प्रियांका गांधींनी पोस्ट केला मोदींचा PHOTO, भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

'OMG यांचे गुडघे दिसतायंत..', प्रियांका गांधींनी पोस्ट केला मोदींचा PHOTO, भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) सध्या एका नव्या वादात सापडले आहे. या मुख्यमंत्र्यांच्या 'फाटलेल्या जीन्स'बाबतच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण भाजप पक्षाला ट्रोल केलं जात आहे. आता प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 19 मार्च: उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) सध्या एका नव्या वादात सापडले आहे. या मुख्यमंत्र्यांच्या 'फाटलेल्या जीन्स'बाबतच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण भाजप पक्षाला ट्रोल केलं जात आहे. रावत यांच्याबरोबच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका केली जात आगे. देशभरातील महिला नेत्यांनी रावत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra), शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी रावत यांना ट्विटरवरून लक्ष्य केलं आहे. दरम्यान या वादात आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी उपहासात्मक ट्वीट करत भाजपला लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

तिरथ सिंह रावत यांनी Ripped Jeans बाबत केलेल्या वक्तव्यानंतर प्रियांका गांधी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये भाजप नेते नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये हे तीनही नेते संघाच्या जुन्या गणवेशात आहेत. ज्यावेळी हाफ पँट हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या गणवेशाचा भाग होता. हा फोटो पोस्ट करत प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, 'OMG, यांचे गुढगे दिसत आहेत'.

प्रियांका गांधी यांचे हे ट्वीट खूप व्हायरल होते आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंगळवारी (16 मार्च) बाल अधिकार संरक्षण आयोगच्या एका कार्यशाळेचं उद्घाटन करताना तिरथ रावत सिंह यांनी असं म्हटलं होतं (Uttarakhand CM on Jeans).

काय म्हणाले होते रावत?

फाटक्या जीन्सच्या वापरावरून तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केले होते. त्यांनी यावेळी एक अनुभव सांगितला होता. ते असं म्हणाले की, 'मी एकदा विमानप्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे.? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचं म्हटलं. तिने अशी देखील माहिती दिली की, तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि महिला स्वयंसेवी संस्था चालवते'.

(हे वाचा-आता स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? अर्थमंत्र्यांनी सुचवलेल्या पर्यायाचा होणार फायदा)

यावर रावत यांनी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं. ते पुढे असं म्हणाले की, 'माझ्या मनात विचार आला, जी महिला NGO चालवते आणि फाटलेली जीन्स घालते, ती समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल लागेल.' त्यांनी पुढे असं देखील म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृतीपासून दूर राहावं लागेल. रावत यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून पडसाद उमटत आहेत. की, महिलांनी फाटलेली जीन्स घालणं म्ह

First published:

Tags: PM narendra modi, Priyanka gandhi vadra, Tirath singh rawat, Uttarakhand