मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री वादात; सरकारी बंगल्यावर केलेल्या कोट्यवधींच्या खर्चामुळे भाजप आक्रमक

ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री वादात; सरकारी बंगल्यावर केलेल्या कोट्यवधींच्या खर्चामुळे भाजप आक्रमक

ठाकरे सरकारमधील या मंत्र्यामुळे भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

ठाकरे सरकारमधील या मंत्र्यामुळे भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

ठाकरे सरकारमधील या मंत्र्यामुळे भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

मुंबई, 19 मार्च : एकीकडे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, उद्योजक यांना कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे. मात्र दुसरीकडे राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचं चित्र समोर येत आहे. या सगळ्या गोष्टींवर आता भाजपकडून टीका केली जात आहे. (Dispute over another minister in Thackeray's government)

राज्यात सर्वसामान्य जनता, शेतकरी हे वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेली असताना दुसरीकडे मात्र मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी केला आहे. या संदर्भात पाठक यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन यांचे बंगले आणि कार्यालयात होणाऱ्या नुतनीकरणाचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. या सगळ्या नुतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असल्याचा आरोप पाठक यांनी केला आहे. एकीकडे वाढीव बिलात कोणतीही सूट द्यायची नाही आणि त्याचा नाहक भुर्दंड सर्वसामान्यांना भोगावा लागत असताना मंत्र्यांच्या बंगले आणि कार्यालयांच्या नुतनीकरणावर कोट्यावधी रुपये कसे खर्च केले जातात, असा सवाल पाठक यांनी केला आहे. या सगळ्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पाठक यांनी केली आहे.

भाजप प्रवक्त्यांकडून काही फोटो शेअर करण्यात आले-

हे ही वाचा-नारायण राणेंनी अमित शहांना लिहिलं पत्र, 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा'

यापूर्वीही पाठक यांनी कोरोना काळात उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या चार्टर्ड विमान प्रवासाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. कोरोना काळात एकीकडे राज्यात सगळ्या खर्चांवर मर्यादा आल्या होत्या.

अगदी आमदारांच्या मानधनातही तीस टक्के इतकी कपात करण्यात आली होती. असं असतानाही राऊत यांनी जुलै महिन्यात दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई असा प्रवास एका दिवसात सरकारी चार्टर्ड विमानाने केला आणि त्याचा खर्च सरकारी वीज कंपन्यांमधून केला असा आरोप पाठक यांनी केला होता. याशिवाय मुळात हे विमान वापरण्यासाठी राऊत यांनी आवश्यक असणारी पूर्व परवानगी मागितली नव्हती, त्यामुळे त्यांनी केलेला प्रवास हा बेकायदा होता असा आरोप पाठक यांनी यांनी केला होता. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणीही पाठक यांनी केली होती. सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना असा खर्च होत असेल तर मंत्री मस्त आणि जनता त्रस्त असंच म्हणावं लागेल, असंही ते पुढे म्हणाले.

First published:

Tags: BJP, Modi government, Nitin raut, PM narendra modi