सावधान! फक्त 20 मिनिटांत पसरतोय कोरोना, घरातच थांबा नाहीतर...

सावधान! फक्त 20 मिनिटांत पसरतोय कोरोना, घरातच थांबा नाहीतर...

भारतात 20 मिनिटांत 4 जणांना व्हायरसची लागण झाली. म्हणजे कोरोना किती जलद गतीने पसरत आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : कोरोनाव्हायरस सध्या झपाट्याने पसरत आहे. एकीकडे जगभरात 4 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असताना, भारतातही याचा धोका वाढत आहे. भारतात सध्या 606 प्रकरणे समोर आली आहे. मुख्य म्हणजे केरळमधील प्रकरणाने सर्वांची चिंता वाढवली आहे. केरळमध्ये बुधवारी (25 मार्च) 20 मिनिटांत 4 जणांना व्हायरसची लागण झाली. म्हणजे कोरोना किती जलद गतीने पसरत आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. मात्र तरी लोक नियम पाळताना दिसत नाही आहेत. एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठी सरकार आणि प्रशासन झटत असताना दुसरीकडे मात्र लोकं नियम धाब्यावर बसवून घराबाहेर पडत आहेत.

केरळच्या कासारगोडमधील (kasargod) येथे क्त एका व्यक्तीमुळे 20 मिनिटात 4 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. कासरगोडमध्ये कोरोनाव्हायरसचा आढळलेला दुसरा रुग्ण 2 दुबईहून भारतात आला होता. 16 मार्चला त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. त्याने चाचणीसाठी स्वॅबचा नमुना दिला, त्यानंतर त्याला घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला. तो स्वत:ला आयसोलेट करून घेण्यापूर्वी 20 मिनिटांमध्येच त्याने तब्बल 4 जणांना कोरोना संक्रमित केलं. आयसोलेशनपूर्वी विमानतळाहून कारमधून घेऊन जाणारा त्याचा मित्र, त्यानंतर घरी आई, पत्नी आणि मुलगा त्याच्या संपर्कात आले. हे चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांवरही आता उपचार सुरू करण्यात आलं आहे.

घरात थांबण्याची गरज

भारतात कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळं सध्या कोरोना हा परदेशातून येणाऱ्या व्यक्तींना होत आहे. मात्र जर कोरोनाग्रस्त व्यक्ती इतरांच्या संपर्कात आल्यास, याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. त्यामुळं लोकांना घरतच राहण्याचे आवाहन सतत केले जात आहे. याआधी मोदींनी 22 मार्च रोजी एका दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी केली. त्यामुळं आता 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे.

वेगाने पसरतोय कोरोना

WHOने जाहीर केलेल्या आकडेवारीत पहिल्या कोरोना रुग्णानंतर 64 दिवसांनी 1 लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मात्र केवळ 11 दिवसात दुसऱ्या टप्प्यात कोरोना पसरला. आता कोरोना इतका झपाट्याने वाढत आहे की, केवळ 4 दिवसांत 1 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही परिस्थिती धक्कादायक असून, यातून बाहेर पडण्य3साठी लवकरात लवकरत उपाय योजना करणे आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: corona
First Published: Mar 26, 2020 09:24 AM IST

ताज्या बातम्या