मुंबई, 26 मार्च : कोरोना झाला असतानाही ते लपून रुग्ण मोकाट फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाची लक्षण समजताच रुग्णाने स्वत: लॅबमध्ये जाऊन कोरोनाची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. यावर रुग्णालयात जाण्याऐवजी तरुणाने ही बाब लपवून ठेवली. ही गोष्ट समोर येताच तरुण राहत असलेली इमारत आणि खासगी लॅब सील केली असल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण तरीदेखील काही लोक नियमांचं उल्लंघन करतात आणि घराच्या बाहेर फिरतात. ठाण्यात झालेल्या या प्रकारामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमिन हादरली आहे. यावर आता आरोग्य विभागालाही ताण पडणार आहे. त्यामुळे असा आपला आजार लपून इतरांचाही जीव धोक्यात घालू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. डॉक्टरच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, 800 लोकांचा जीव धोक्यात कोरोनाव्हायरचा धोका भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 600हून अधिक झाला आहे. या सगळ्यात दिल्लीतील एका डॉक्टरालाच कोरोनाची लागण झाली आहे. यामुळं तब्बल 800 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या डॉक्टराचे मोहनपुरी भागातील मोहल्ला येथे क्लिनिक होते. त्यामुळे त्याच्याकडून उपचार घेतलेल्या रुग्णांचा शोध सध्या पोलीस आणि आरोग्या विभागाचे कर्मचारी घेत आहेत. असे सांगितले जात आहे की सौदी अरेबियातून परतेल्या एका महिलेवर या डॉक्टरांनी उपचार केले होते. मोहल्ला क्लिनिकच्या डॉक्टरांना या महिलेकडूनच कोरोना संक्रमण झाले. त्यानंतर आता या डॉक्टरांची पत्नी व मुलगी यांनाही कोरोना झाला आहे. आता मौजपूर परिसरातील सुमारे 800 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 12 मार्च ते 18 मार्च दरम्यान, या डॉक्टरांकडून उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास तातडीने रुग्णालयात जाण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण परदेशात गेला होता की नाही हे अद्याप कळू शकले नाही. मोहल्ला क्लिनिकमध्ये केले जातात प्रथमोपचार दिल्ली सरकार इथल्या बर्याच भागात मोहल्ला क्लिनिक चालवले जाते. जेथे स्थानिक लोकांना प्रथमोपचार सेवा दिल्या जातात. दिल्लीत गेल्या चोवीस तासात पाच कोरोनामुळे संसर्गग्रस्त रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर कोरोना-संक्रमित लोकांची संख्या येथे 35 झाली आहे. त्यापैकी एक परदेशी नागरिक आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.