मुंबई, 24 मार्च : जगभरात थैमान घातलेला कोरोना झपाट्याने भारतात पसरत आहे. भारतात महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 400हून अधिक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली आहे. याआधी महाराष्ट्रात 144 कलम लावण्यात आले होते, मात्र लोकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळा नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांना संचारबंदी जाहीर करण्यात आली. संचारबंदी जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर काय खुले राहणार याबाबत अनेक मेसेज व्हायरल होत होते. यातच आणखी एक फेक मेसेज फॉरवर्ड केला जात होता. यामध्ये मुंबईतील दुकाने ठराविक वेळांसाठी खुले राहतील, असे नमुद करण्यात आले होते. मात्र या सगळ्या अफवा असल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केली आहे. वाचा- Coronavirus : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 14 कोटींचे मास्क केले जप्त व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये दुध विक्रेत्यांची दुकाने सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत खुले असतील. वर्तमानपत्र विक्रेत्यांची दुकाने सकाळी 7पर्यंत. तर भाजीपाला, किराणा आणि औषधांची दुकाने सकाळी 8 ते 11 पर्यंत खुले असतील असे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनी असे आदेश दिले आहेत, असेही सांगण्यात आले होते. मात्र मुंबई पोलिसांनी आज ट्वीट करत, या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. वाचा- Good News: भारतातील 37 रुग्णांनी केली कोरोनावर मात, आज रुग्णालयातून होणार सुट्टी
Rumours are no less infectious than #coronavirus ! This looks like a meticulous list, but a fake one too! Please note that no such directions have been given by @CPMumbaiPolice . In case of any doubt, please #Dial100 or tweet to us! #TakingOnCorona pic.twitter.com/EQcHWGa0rU
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) March 24, 2020
वाचा- CORONAVIRUS : संचारबंदीत कारमध्ये सेक्स करताना आढळले तरुण आणि महिला मुंबई पोलिसांनी ट्वीट करत, अफवा या कोरोनाव्हायरसपेक्षा जास्त धोकादायक आहे. त्याही लवकर पसरतात. सध्या व्हायरल होत असलेली ही यादी बनावट आहे. कृपया लक्षात घ्या की असे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाही, अशी माहिती दिली. वाचा- ‘एकदम खरं! कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो’, WHOने केलं कौतुक संचारबंदीमध्ये काय सुरू राहणार, काय असणार बंद? -जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात येणार आहेत, त्यामुळे तुम्ही जिल्ह्याबाहेर प्रवास करू शकणार नाहीत. -खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरंच सुरू राहतील. -रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. - इतर राज्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद केल्या आहोत. या वाहतूक -बंदीत खासगी वाहने देखील आली. -जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरू राहतील. -पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. -कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरू राहील. -सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील. -प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. -घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत.