Home /News /national /

'एकदम खरं! कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो', WHOने केलं कौतुक

'एकदम खरं! कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो', WHOने केलं कौतुक

ऑस्ट्रिया - आतापर्यंत 9,851 लोकांना लागण आणि 128 मृत्यू.

ऑस्ट्रिया - आतापर्यंत 9,851 लोकांना लागण आणि 128 मृत्यू.

भारताने कोरोनाचा फैलाव लक्षात घेता अनेक कठोर पाऊलं उचलली पण ती योग्य असल्याचं रेयान म्हणाले आहेत.

    नवी दिल्ली, 24 मार्च : कोरोनाला हरवणं हे आपल्या हातात आहे आणि भारतच कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी व्यक्त केला आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारतानं देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. भारताने कोरोनाचा फैलाव लक्षात घेता अनेक कठोर पाऊलं उचलली पण ती योग्य असल्याचं रेयान म्हणाले आहेत. कोरोनाला थांबवण्यासाठी असेच कठोर नियम लागू करा असंही WHO ने भारताला सुचवलं आहे. त्यामुळे देशात कोरोनाला थांबवण्यासाठी सरकार योग्य ती पाऊलं उचलत आहे. पण त्याला प्रत्येक नागरिकांने पाठिंबा देत नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. कोरोनावर आपणच मात करू शकतो. कोरोनाला पळून लावणं हे प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. त्यामुळे नियम पाळा आणि घरीच सुरक्षित राहा. हे वाचा - 'तो' अपघात पडला महागात, एका तरुणीमुळे 5000 लोकांना झाला कोरोना भारताबाबत बोलायचं झाल्यास, देशातील 30 राज्य सध्या लॉक डाऊन करण्यात आली आहेत. तर, महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. भारत सध्या दुसऱ्या टप्प्यात असला तरी, भारतात वेगानं कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताने केलेल्या उपायांचे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी कौतुक केलं. हे वाचा - धक्कादायक! बँक मॅनेजरने होम क्वॉरांटाइन महिलेला बोलावलं कामावर रेयान यांनी, भारत हा चीनसारख्या जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. चीनचं काय झालं आपण सर्वांनी पाहिलं. मात्र सार्वजनिक आरोग्य पातळीवर भारतानं घेतलेली आक्रमक भुमिका योग्य आहे, असं सांगितलं. तसंच, लोकांच्या आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीनं भारतानं घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारतानं ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा भारत आता देत आहे, असंही रेयान म्हणाले.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या