Good News: भारतातील 37 रुग्णांनी केली कोरोनावर मात, आज रुग्णालयातून होणार सुट्टी

Good News: भारतातील 37 रुग्णांनी केली कोरोनावर मात, आज रुग्णालयातून होणार सुट्टी

भारतातील बहुते लोकांमध्ये सौम्य संसर्ग आहे. सध्या केवळ 5 टक्के लोकांना ICUमध्ये ठेवण्याची गरज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च : संपूर्ण देश कोरोनाच्या भीतीने हैराण झाला असताना एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतामध्ये तब्बल 37 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिसचार्ज देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर कोरोनाच्या मृतांच्या संख्येत वाढ झाली नसून तो आकडा 9वरच आहे. त्यामुळे भारत कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी होणार असंच म्हणावं लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जाणार आहेत. तर मुंबईतही एक जोडपं कोरोनावर मात करून घरी जाणार आहेत. आज त्यांची अखेरची चाचणी करण्यात येणार आहे. खरंतर देशामध्ये कोरोनाचा वाढता फैलाव पाहता तात्काळ कठोर निर्णय घेण्यात आले. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मदत होत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, यापैकी बहुतेकांना कोणत्याही औषधाची गरज नाही आहे. सध्या त्यांच्यावर सहाय्यक उपचार केले जात आहेत. भारतातील बहुते लोकांमध्ये सौम्य संसर्ग आहे.  सध्या केवळ 5 टक्के लोकांना ICUमध्ये ठेवण्याची गरज आहे.

'एकदम खरं! कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो', WHOने केलं कौतुक

कोरोनाला हरवणं हे आपल्या हातात आहे आणि भारतच कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी व्यक्त केला आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारतानं देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. भारताने कोरोनाचा फैलाव लक्षात घेता अनेक कठोर पाऊलं उचलली पण ती योग्य असल्याचं रेयान म्हणाले आहेत.

548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरातील 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन तर अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई केली जाणार आहे.देशभरात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97 म्हणजे जवळपास 100 च्या जवळ पोहोचल्यानं भीती आणि चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्फ्यू लागू केला आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. 15 हजारहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा व्हायरस आता वेगानं पसरत असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी पंजाबमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्फ्यू लावण्यात आला होता. महाराष्ट्रातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कर्फ्यू लावला आहे.

First published: March 24, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या