Home /News /news /

Coronavirus : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 14 कोटींचे मास्क केले जप्त

Coronavirus : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 14 कोटींचे मास्क केले जप्त

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

2 रुपयांना येणारा हा मास्क 10 रुपयांमध्ये आणि 100 रुपयांचा मास्क हा 400 रुपयांमध्ये विकण्याचा या भामट्यांचा डाव होता.

विवेक गुप्ता, प्रतिनिधी मुंबई, 24 मार्च : महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. खबरदारी म्हणून लोकं मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहे. राज्यावर आलेल्या या संकटातही काही लोकं फायदा उचलण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी अशा या टोळीचा पदार्फाश केला आहे. मुंबईत तब्बल 14 कोटी रुपये किंमतीचे मास्क जप्त केले आहे. देशातली ही सर्वात मोठी कारवाई आहे. मुंबई क्राइम ब्रांचने मास्कचा मोठा साठा जप्त केला आहे.  या आरोपींनी मोठ्या प्रमाणात मास्कचा साठा करून ठेवला होता. तब्बल 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहे. याची किंमतही 14 कोटी इतकी आहे. हे मास्क काळ्याबाजारात विकण्याचा आरोपींचा हेतू होता. 2 रुपयांना येणारा हा मास्क 10 रुपयांमध्ये आणि 100 रुपयांचा मास्क हा 400 रुपयांमध्ये विकण्याचा या भामट्यांचा डाव होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे. मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का लावा -आशिष शेलार दरम्यान, मास्कचा बेकायदेशीर साठा करुन काळाबाजार केल्याप्रकरणी वांद्रे येथे सापडेल्या दोषींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. मात्र, अशा परिस्थितीत काही जणांकडून मास्कचा काळाबाजार सुरू आहे. मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आलेल्या मास्कचा साठा करणाऱ्यांवर वांद्रे परिसरात आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास 14 कोटींचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी बांद्रे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या कारवाई बद्दल आशिष शेलार यांनी पोलिसांचे कौतुक केलं आहे. तसंच या प्रकारणी दोषी असणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या