Home /News /videsh /

CORONAVIRUS : संचारबंदीत कारमध्ये सेक्स करताना आढळले तरुण आणि महिला, पोलिसांनी घेतलं ताब्यात

CORONAVIRUS : संचारबंदीत कारमध्ये सेक्स करताना आढळले तरुण आणि महिला, पोलिसांनी घेतलं ताब्यात

लोकांना घरात राहण्याचं सल्ला देण्यात आला असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी सुद्धा हे कपल अशा परिस्थितीत आढळून आलं

    मिलान, 24 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जगभरातील अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहे. काही ठिकाणी ज्या शहरात जास्त संसर्ग झाला आहे, अशी शहरं पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आली आहे. इटलीमध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे.  सर्वाधिक मृतांचा आकडा हा इटलीमधून समोर आला आहे. संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आलं आहे. परंतु, याच दरम्यान, सर्व निर्बंध तोडून एक तरुण आणि महिला गाडीत सेक्स करत असल्याचं आढळून आलं आहे. पोलिसांनी या दोघांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मिलान शहरात घडली आहे. एक 23 वर्षीय तरुण आणि 40 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण मूळचा इजिप्तचा राहणार आहे. तर महिला ट्यूनेशियाची आहे. शहरापासून काही अंतरावर पोलिसांना एक कार आढळली. कारची हालचाल होत असल्यामुळे पोलिसांनी जवळ जावून पाहिले असता हे कपल शरिरसंबंध ठेवत असल्याचं आढळून आलं. हेही वाचा : कहर! लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांचा पोलिसांनी केला 'मुर्गा', VIDEO VIRAL शहरात कर्फ्यू लागलेला असतानाही हे कपल असं कृत्य करत होतं. धक्कादायक बाब म्हणजे, याच परिसरात कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त प्रादुर्भाव आढळून आला आहे. लोकांना घरात राहण्याचं सल्ला देण्यात आला असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी सुद्धा हे कपल अशा परिस्थितीत आढळून आलं आहे. आधीच कर्फ्यू लागू असल्यामुळे गाडीतून प्रवास करण्यास मुभा नाही. ANSA या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या