मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर काही तासातच मुंबईत नियम धाब्यावर, क्लब्समध्ये खुलेआम होतेय Party All Night

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर काही तासातच मुंबईत नियम धाब्यावर, क्लब्समध्ये खुलेआम होतेय Party All Night

Mumbai Club Video: महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. दरम्यान हॉटेल व्यावसायिक, नाइट क्लब्स, रेस्टॉरंट्स यांच्याकडून कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याची बाब वेळोवेळी निदर्शनास येत आहे.

Mumbai Club Video: महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. दरम्यान हॉटेल व्यावसायिक, नाइट क्लब्स, रेस्टॉरंट्स यांच्याकडून कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याची बाब वेळोवेळी निदर्शनास येत आहे.

Mumbai Club Video: महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. दरम्यान हॉटेल व्यावसायिक, नाइट क्लब्स, रेस्टॉरंट्स यांच्याकडून कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याची बाब वेळोवेळी निदर्शनास येत आहे.

मुंबई, 14 मार्च: महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी (Coronavirus Cases in Maharashtra) चिंताजनक आहे. दरम्यान हॉटेल व्यावसायिक, नाइट क्लब्स, रेस्टॉरंट्स यांच्याकडून कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर (COVID-19 Restrictions) बसवले जात असल्याची बाब वेळोवेळी निदर्शनास येत आहे. 'अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे', असा इशारा शनिवारी मुख्यमंंत्र्यांनी दिला होता. मात्र त्यानंतर काही तासातच समोर येणारे मुंबईतील नाइट क्लबचे व्हिडीओ धक्कादायक आहेत. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी शनिवारी मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackarey) दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

मात्र मुंबईच्या अंधेरीमधून समोर आलेला नाइट क्लबमधील पार्टीचा व्हिडीओ धक्कादायक आहे कारण यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे अशा कोणत्याच नियमाचं पालन उपस्थित लोकांकडून केलं जात नाही आहे. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

(हे वाचा-नियमांचं पालन न केल्यास विमान प्रवासावर कायमची बंदी; DGCAची नवी नियमावली)

या नाइट क्लबमध्ये आज सकाळपर्यंत ही पार्टी सुरू होती, त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. अंधेरीमधून समोर आलेल्या व्हिडीओबाबत मुंबई महानगर पालिका काय भूमिका घेणार ते पाहणं आवश्यक ठरेल.

या क्लबमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करण्यात आलं नव्हतं, त्याचप्रमाणे उपस्थितांनी मास्क घातले नव्हते, शिवाय निश्चित मर्यादेपेक्षा जास्त लोकं या क्लबमध्ये उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे याठिकाणी 12 वाजल्यानंतर देखील पार्टी सुरू होती. गेल्या आठवड्यामध्ये देखील या क्लबमध्ये नियमांची पायमल्ली करण्यात आली होती, तसे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

(हे वाचा-मोठी बातमी: काही देशांच्या तक्रारींनंतर भारतही तपासणार कोव्हिशील्डचे साइड इफेक्ट)

याठिकाणी स्थानिक बीएमसी वॉर्डकडून अशी प्रतिक्रिया समोर आली आहे की, लवकरच या क्लबच्या व्यवस्थापनाविरोधात कारवाई केली जाईल. पार्टी करणाऱ्यांवर निर्बंध नाहीत, पण सामान्य नागरिकांवर कारवाई केली जाते असं का? असे सवाल नाइट क्लबमधील असे फुटेज समोर आल्यानंतर सामान्य नागरिकांकडून संतप्त सवाल विचारले जात आहेत.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona updates, Corona vaccine, Coronavirus, Covid19, Lockdown, Party night