मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेलचालकांना दिला शेवटचा इशारा

आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेलचालकांना दिला शेवटचा इशारा

'कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे,' अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे.

'कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे,' अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे.

'कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे,' अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे.

मुंबई, 13 मार्च : 'गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे 4 महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे,' अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेल्या 4 महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

हॉटेलचालकांना मुख्यमंत्र्यांनी नेमक्या काय सूचना दिल्या?

'मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे, त्यामुळे परीवारांतल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

हेही वाचा - काही देशांनी लशीचा वापर बंद केल्यानंतर आता भारतही कोव्हिशिल्डचे साइड-इफेक्ट्स तपासणार

गेल्या आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये त्यांना कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव त्यांनी आपणास सांगितला होता. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्सआणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स , मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्व जन नियम धुडकावत आहेत असे नाही, पण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हाला सुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Lockdown, Uddhav Thackeray (Politician)