मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /नियमांचं पालन न केल्यास विमान प्रवासावर कायमची बंदी; DGCAकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

नियमांचं पालन न केल्यास विमान प्रवासावर कायमची बंदी; DGCAकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

DGCA ने आपल्या परिपत्रकात नियमावली जारी केली असून याचे पालन करणे अनिवार्य असणार आहे

DGCA ने आपल्या परिपत्रकात नियमावली जारी केली असून याचे पालन करणे अनिवार्य असणार आहे

DGCA ने आपल्या परिपत्रकात नियमावली जारी केली असून याचे पालन करणे अनिवार्य असणार आहे

    नवी दिल्ली, 13 मार्च: जर तुम्ही येत्या काही दिवसात विमान प्रवासाचे नियोजन करीत असाल तर तुम्हाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रवासादरम्यान जर तुम्ही कोणत्याही स्वरुपाची चूक केली तर तुमच्या विरोधात डायरेक्ट्रेड जनरल आॅफ सिव्हील एव्हिएशन (DGCA) कडक कारवाईचा बडगा उगारेल. देशात कोरोना संसर्गाचं (Corona) प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं नवीन मार्गदर्शक सूचना (Guidelines) घोषित केल्या आहेत. जर प्रवाशांनी विमान प्रवासादरम्यान मास्क वापरला नाही किंवा महामारीशी निगडीत मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केलं तर अशा प्रवाशांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. जर सातत्यानं प्रवाशांनी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कायमस्वरुपी विमान प्रवास बंदी घातली जाऊ शकते.

    डीजीसीएने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एअरपोर्टवर दाखल झाल्यापासून ते तेथून बाहेर पडेपर्यंत मास्क (Mask) लावणं अनिवार्य आहे. विमान प्रवासादरम्यान जे प्रवासी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करणार नाहीत त्यांना विमानातून उतरवलं जाईल. तसेच जे प्रवासी वारंवार नियमांचं उल्लंघन करतील त्यांना उपद्रवी प्रवासी म्हणून घोषित केलं जाईल.

    डीजीसीएच्या परिपत्रकातील ठळक बाबी...

    1 विमान प्रवासादरम्यान मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे.

    2 अपवादात्मक स्थिती व्यतरिक्त मास्क नाकाखाली आणता येणार नाही.

    3 विमानतळावर प्रवासी प्रवेश करताना सीआयएसएफ (CISF) किंवा पोलिस कर्मचारी मास्क न लावता आत येऊ शकणार नाहीत याची काळजी घेतील

    4 विमानतळ संचालक (Airport Director) किंवा टर्मिनल व्यवस्थापक (Terminal Manager) हे प्रवाश्यांनी मास्क व्यवस्थित लावला आहे की नाही, प्रवाश्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातय की नाही यावर लक्ष ठेवतील.

    5 विमानतळ परिसर किंवा विमानात जर कोणाताही प्रवासी नियमांचं पालन करत नसेल तर त्यास इशारा देऊन सोडून देण्यात येईल. परंतु, कायद्यानुसार कारवाई करण्याचा उल्लेख या परिपत्रकात आहेत.

    (हे वाचा: मोठी बातमी: काही देशांच्या तक्रारींनंतर भारतही तपासणार कोव्हिशील्डचे साइड इफेक्ट  )

    6 उड्डाणापूर्वी विमानात बसलेला कोणताही प्रवासी इशारा देऊनही मास्क नीट लावत नसेल तर त्यास विमानातून उतरुन देण्यात येईल.

    7 विमान प्रवासात एखादा प्रवासी सातत्याने मास्क वापरण्यास नकार देत असेल आणि कोविड नियमांचं पालन करत नसेल तर त्यास उपद्रवी प्रवाश्याप्रमाणे वागणूक दिली जाईल.

    8 उपद्रवी प्रवासी यादीतील प्रवाश्यांना विमान प्रवासास बंदी (Ban for Air Travel) केली जाईल. नव्या नियमांनुसार ही बंदी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल.

    First published:
    top videos

      Tags: Corona, Corona virus in india, Travel by flight