मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भाजपच्या गडाला भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात!

शिवसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भाजपच्या गडाला भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात!

हे नगरसेवक आता सेनेच्या गटात दाखल झाले आहे, त्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हे नगरसेवक आता सेनेच्या गटात दाखल झाले आहे, त्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हे नगरसेवक आता सेनेच्या गटात दाखल झाले आहे, त्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

जळगाव, 16 मार्च : जळगावमध्ये (Jalgaon municipal corporation)  शिवसेनेनं (Shivsena) जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या (BJP) गडाला सुरुंग लावला आहे. भाजपचे 25 नगरसेवक हे ठाण्यात दाखल झाले आहे. आता त्यापाठोपाठ आणखी 5 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहे.  ठाण्यात एकत्र आलेल्या नगरसेवकांची संख्या 30 वर पोहोचली आहे. भाजपचे 57 पैकी 30 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहे.

जळगाव महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेनं 27 नगरसेवक फोडून सुरूंग लावला आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी आणि राज्य भाजपचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीष महाजन यांच्यावर आहे. पण आता महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे बहुमत संख्याबळ शिवसेनेनं राजकीय सर्जिकल स्ट्राईक करत उद्धवस्त केले आहे.

पती जाडी, काळी आणि कुरूप म्हणतो, मारहाणीसह अपमानाला वैतागलेल्या पत्नीची तक्रार

जळगाव महापालिकेचे शिवसेनेनं फोडलेले सर्व 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच गिरीष महाजनांचा राजकीय पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच दे धक्का देण्याची रणनीती शिवसेनेनं आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन नोंदणीबाबत मोठी बातमी; भरावा लागू शकतो दंड

विशेष म्हणजे, 57 सदस्य असलेल्या भाजपकडे महापौरपद आहे. मात्र, नव्या महापौरांची निवड होणार आहेत. यावेळी भाजपचे काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी सोमवारी मुंबई गाठली आहे. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. हे नगरसेवक आता सेनेच्या गटात दाखल झाले आहे, त्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Jalgaon, Maharashtra, Shivsena