मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी, मुंबईला मिळणार नवे पोलीस आयुक्त, कुणाची लागणार वर्णी?

मोठी बातमी, मुंबईला मिळणार नवे पोलीस आयुक्त, कुणाची लागणार वर्णी?

मुंबई पोलीस आयुक्त कोण? याकडे अंडरवर्ल्ड डॉन, सट्टेबाज यांच्यासह अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि अधिकारी यांचे लक्ष लागून आहे.

मुंबई पोलीस आयुक्त कोण? याकडे अंडरवर्ल्ड डॉन, सट्टेबाज यांच्यासह अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि अधिकारी यांचे लक्ष लागून आहे.

मुंबई पोलीस आयुक्त कोण? याकडे अंडरवर्ल्ड डॉन, सट्टेबाज यांच्यासह अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि अधिकारी यांचे लक्ष लागून आहे.

मुंबई, 16 मार्च : सचिन वाझे (Sachin Vaze case) प्रकरण मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांना चांगलेच भोवणार असं दिसत आहे. कारण गेल्या 24 तासांपासून मुंबई पोलीस आयुक्त बदलाचे (Mumbai Police Commissioner) वारे वाहू लागले आहे. त्यामुळे नवीन मुंबई पोलीस आयुक्त कोण? या प्रश्नांचे उत्तर मुंबई पासून ते दिल्लीपर्यंत एवढंच नाही तर परदेशात बसलेले अडंरवर्ल्ड डॉनना देखील पाहिजे असते. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोणाला पसंती देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई पोलीस आयुक्त.. या पदाचा दरारा फक्त मुंबई आणि देशातच नाही तर परदेशातही आहे. मुंबई पोलीस दलात आजवर काम केलेल्या आणि काम करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाने मुंबई पोलीस आयुक्तपदाला आज जगभर मान दिला जातो. एकदा तरी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा मुकुट घालावा अशी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची इच्छा असते. त्यामुळे नवीन मुंबई पोलीस आयुक्त कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भाजपच्या गडाला भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात!

मुंबई पोलीस आयुक्त कोण? याकडे अंडरवर्ल्ड डॉन, सट्टेबाज यांच्यासह अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि अधिकारी यांचे लक्ष लागून आहे. तर सेवा ज्येष्ठतेनुसार अनेक पोलीस अधिकारी मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या रेस मध्ये आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तपदी कोण?

-संजय पांडे (Sanjay Pande) हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी असून आयआयटीत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं आहे. शिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार संजय पांडे हेच मुंबई पोलीस आयुक्त पदाकरता अग्रस्थानी आहेत. याआधीच्या सर्व सरकारांनी संजय पांडे यांना नेहमी डावललं आहे. मात्र, न्यायालयीन लढा लढत संजय पांडे यांनी सर्व महत्वाची पदे भुषवली आहेत. पण याही सरकारशी संजय पांडे यांची जवळीक नसल्याने संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्तपदी विराजमान होतील असं दिसत नाही.

रजनीश शेठ :  1988 बॅचचे रजनीश शेठ (Rajnish Seth) हे शांत आणि हायप्रोफल चमकेशगिरी करणारे नसून कधीच कोणत्या वादात सापडले नाही. भाजप काळात जसं स्वच्छ चारित्र्याचे लो प्रोफाइल आणि कायदा सुव्यवस्था राखणारे दत्ता पडसलगीकर हे पोलीस आयुक्त होते. तसेच आयुक्त आता महाविकास आघाडीला पाहिजेत म्हणून रजनीश शेठ यांचे नाव जास्त चर्चेत आहे.

पती जाडी, काळी आणि कुरूप म्हणतो, मारहाणीसह अपमानाला वैतागलेल्या पत्नीची तक्रार

रश्मी शुक्ला : पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार तसंच विविध मोठी पदे भुषवलेल्या रश्मी शुक्ला या एकमेव महिला अधिकारी मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या रेसमध्ये आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिली महिला आयपीस म्हणून यांची वर्णी लागण्याची जास्त शक्यता होती. मात्र महाराष्ट्र बॅंक प्रकरणामुळे रश्मी शुक्ला यांनी राज्यातील सरकारची नव्हे तर केंद्र सरकारची देखील नाराजी ओढावून घेतली होती. शिवाय रश्मी शुक्ला यांची या सरकारशी जवळीक देखील नाही. त्यामुळे रश्मी शुक्ला यांचा याही वेळेस पत्ता कट झाल्यात जमा आहे.

राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणं महागणार; 1 एप्रिलपासून खिशावर होऊ शकतो परिणाम

यांच्या व्यतिरिक्त सेवा ज्येष्ठतेनुसार 1886 बॅचचे एस पी यादव, संजय पांडे, 1987 बॅचचे बिपीन बिहारी, सुरेंद्र पांडे, डी कनकरत्नम, के व्यंकटेशम यांना ही मुंबई पोलीस आयुक्तपदाची अपेक्षा आहे. खरंतर राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन करताना 'पॉवर फुल' नेत्याचा मंत्रिमंडळावर वरचष्मा पाहता मुंबई पोलीस आयुक्तपदी देखील त्या  नेत्याच्या राजकीय खेळीप्रमाणे 'कहानी में ट्विस्ट' करत रेसमध्ये नाव नसलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या गळ्यात मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ पडणार अशी ही चर्चा आयपीएस लॉबीत आहे तो अधिकारी कोण? याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Mumbai police, Police commissioner, Sachin vaze