मुंबई, 15 मार्च : सौंदर्याच्या दिखाऊ कल्पना भारतीय समाजातील अनेकांच्या मनात किती खोलवर रुजलेल्या आहेत हे सांगणारी घटना नुकतीच घडली. या कल्पना किती गंभीर नुकसान करू शकतात आणि त्यांच्यामुळं काय होऊ शकतं हे नक्की वाचा. (domestic violence)
एका महिलेनं पोलीस स्थानकात आपल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. ही तक्रार तिनं अहमदाबादच्या घटलोडीया इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली. आपल्या पतीवर तिनं गंभीर आरोप केले. (Mumbai man taunts wife saying fat and dark)
या तेवीसवर्षीय महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे, की पतीनं आपल्याला मारहाण केली. सोबतच अतिशय अवमानकारक शब्द आपल्यासाठी वापरले. पतीनं 'जाडी, काळी आणि कुरूप' म्हणल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत सांगितलं आहे. (Ahmedabad woman files complaint against husband)
हेही वाचा माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा, सुसाईड नोट लिहित युवकानं झाडली स्वतःवर गोळी
या महिलेचा अविवाह 2018 साली मुंबईत ग्रॅन्ट रोड इथं राहणाऱ्या एका व्यक्तीशी झाला होता. मात्र विवाहानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्यांनी तिला तिच्या दिसण्यावरून टोमणे मारायला सुरवात केली. (woman harassed over looks, files complaint)
महिलेनं तिच्या तक्रारीत असंही म्हटलं आहे, की विवाहानंतर काही महिन्यातच सासरच्यांनी तिच्यावर दबाव टाकायला सुरवात केली. त्यांचं म्हणणं होतं की तिनं हुंडा द्यावा. तिच्या माहेरच्यांना ही रक्कम देणं शक्य झालं नाही तेव्हा महिलेनं तिला मारहाण केली गेल्याचं सांगितलं. अगदी लहानसहान कारणावरून ही मारहाण झाल्याचं TOI च्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा भाजप खासदाराच्या सुनेनं केला आत्महत्येचा प्रयत्न, पतीवर केले गंभीर आरोप
महिला म्हणते, की पती सतत आपल्याला दिसण्यावरून हीन शेरेबाजी करायचा. ती सांगते, 'तो म्हणायचा, की माझी गर्लफ्रेंड सुंदर होती. मी जेव्हा कधी त्याला विरोध दर्शवायचे तेव्हा तो मला मारहाण करायचा. सासरचे लोकही त्याला तसं करण्यास प्रोत्साहन द्यायचे.
महिलेनं पुढं म्हटलं, की सासरचे लोक म्हणायचे, की मी अवलक्षणी आहे कारण मला भाऊ नाही. मलासुद्धा मुलगा होणार नाही. तिनं मुलीला जन्म दिला तर वाईट परिणाम होतील अशी धमकीही तिला दिली जायची. पती चांगलं जेवण न बनवल्यानंही मारहाण करायचा असं तिनं म्हटलं आहे. स्थानिक पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Police complaint, Wife and husband