मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, नवा आदेश जारी

लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, नवा आदेश जारी

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

लॉकडाउनच्या काळात मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल बंद करण्यात आली होती. अखेर आता अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सुरू करण्यात आली आहे.

मुंबई, 16  जून : लॉकडाउनच्या काळात मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल बंद करण्यात आली होती. अखेर आता अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता रेल्वे कर्मचारी असलेल्या पासधारक असलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वे विभागाने मोठा दिलासा दिला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या पासची वैधता संपली होती. त्यांना आता मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.  वेगवेगळ्या  महिन्यांमध्ये जारी करण्यात आलेल्या पासेससाठी वैधतेचा कालावधीही निराळा असणार आहे. सोमवारी यासंबंधी रेल्वे बोर्डाचे डिप्टी डायरेक्ट्र एस्टॅब्लिशमेंट (वेलफेअर)-1 बी. मुरलीधरन यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. हेही वाचा -ई पास असेल तरच करता येणार मुंबई लोकलने प्रवास, जारी करण्यात आले नवे नियम काही अटींच्या आधारावर ट्रान्सफर पास, किट पास, सेटलमेंट पास, स्कूल पास आणि स्पेशल पासची वैधतादेखील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तारखेच्या स्लॅबनुसार वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवा म्हणून 15 तारखेपासून लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी लोकलमधून जवळपास 55000 प्रवाशांनी प्रवास केला.  तर मध्य रेल्वेवर 30000 आणि  पश्चिम रेल्वे मार्गावर 25000 प्रवाशांना लोकलने प्रवास करता आला. आज हाच आकडा जवळपास 1.25 लाखांवर पोहोचण्याची शक्यता आङे. असे आहे रेल्वेचे वेळापत्रक आणि नियम दरम्यान,  राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 146 उपनगरीय फेऱ्या धावणार आहेत. त्या चर्चगेट ते डहाणू रोड या मार्गावर धावतील. बहुतांश लोकल या जलद मार्गाने चालविण्यात येतील. सकाळी 5.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत सरासरी 15 मिनिटांनी लोकल सेवा सुरू असेल. हेही वाचा -महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, पुणे परिसरातही मिळणार 7 हजार कोटींची गुंतवणूक बहुतांश लोकल या चर्चगेट ते विरार या दरम्यान धावणार आहे. या लोकल चर्चगेट ते बोरीवली दरम्यान जलद तर त्यापुढे धीम्या गतीने धावतील. तर विरार ते डहाणू या मार्गावर 16 लोकल धावतील. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन अशा 200 फेऱ्या सुरू होणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या मार्गांवर 130 लोकल फेऱ्या होतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर 70 फेऱ्या होतील. कार्यालयीन वेळांप्रमाणे सकाळी 7, 9, दुपारी 3 सायंकाळी 6, रात्री 9, 11 याप्रमाणे गाड्या चालविण्यात येतील.  संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Central railway, Mumbai local, मुंबई लोकल

पुढील बातम्या