महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, पुणे परिसरातही मिळणार 7 हजार कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, पुणे परिसरातही मिळणार 7 हजार कोटींची गुंतवणूक

कोरोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण निर्माण झालेलं असताना या घडामोडीने राज्याला दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा आज शुभारंभ झाला. या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांमधील गुंतवणुकदारांसोबत सामंजस्य करार केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने झालेल्या या समारंभात 16 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मॅग्नेटिक महाराष्ट्र मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 13 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत.

कोविडच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उद्योगविश्व ठप्प झाले असताना महाराष्ट्राचा उद्योग विभाग या क्षेत्राला गती देण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश येत असून त्याच अनुषंगाने आज हे करार करण्यात आले. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील गुंतवणुकदारांसोबत आज सामंजस्य करार झाले. यावेळी संबंधित देशांचे राजदूत, वाणिज्यदूत उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन उपस्थित होते.

राज्याच्या विविध जिल्ह्यात याद्वारे उद्योग सुरू होणार आहेत. तर पुणे आणि परिसरात तब्बल सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळणार आहे.

महाराष्ट्र अग्रेसर ठेवणे हेच उद्दिष्ट - मुख्यमंत्री

कोरोना संसर्ग सारख्या बिकट परिस्थितीतही महाराष्ट्र अग्रेसर ठेवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यादृष्टीनेच आजच्या कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोना संसर्गसारख्या बिकट परिस्थितीतही राज्याचे, उद्योग विश्वाचे मनोधैर्य उंचावून ठेवणे आवश्यक आहे. तसेच जगभरातील गुंतवणूकदार, उद्योग विश्वाचा गुंतवणुकीस अनुकूल राज्य म्हणून महाराष्ट्रवरील विश्वास देखील अबाधित राखणे गरजेचे आहे. म्हणूनच आजचे करार खूप महत्वपूर्ण आहेत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 15, 2020, 10:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading