कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका, वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका, वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका करण्यात भारतीय दुतावासाला यश मिळालं आहे. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’ संबोधलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : कोरोना व्हायरसशी (Coronavirus COVID-19)लढण्यासाठी भारत सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. जगभरातून भारतीय सरकारचं कौतुक देखील होत आहे. भारताने ज्याप्रकारे धैर्याने कोरोनाशी लढा सुरू ठेवला आहे, त्यामुळे भारत खरंच कौतुकास पात्र आहे. आपल्या देशाकडून आणखी एक महत्त्वाचं काम सुरू आहे, ते म्हणजे इतर देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप भारतात परत आणणे. त्याचप्रमाणे इतर देशातून नागरिक परतले की कोरोना व्हायरसचं संक्रमण नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हानही भारत सरकार पेलत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारं मिळून सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

(हे वाचा-जर्मनीहून आलेले चौघे संशयित ट्रेनमध्ये; हातावरचा 'स्टँप' बघून TC ने उतरवलं)

Times Now ने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील अशीच एक घटना समोर येत आहे. मुंबईस्थित सुजय कदम यांची मुलगी इटलीमध्ये शिक्षणासाठी गेली होती. सोशल मीडियावर त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. त्यांची मुलगी तिचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी 4 फेब्रुवारीला इटलीतील मिलान या ठिकाणी गेली. मात्र तिचं महाविद्याल COVID-19 मुळे बंद ठेवण्यात आलं. कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’28 फेब्रुवारीला तिने सांगितलं की सर्वकाही ठिक आहे आणि तिने रेंट अग्रीमेंट वगैरे करून घेतलं आहे. पण 10 मार्चपर्यंत इटलीमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. माझ्या मुलीला भारतात परत यायचं होतं, मात्र इटली सरकारकडून त्यासंदर्भात अनेक कागदपत्रांची मागणी केली जात होती.’

(हे वाचा-धक्कादायक! परदेशातील तब्बल 276 भारतीय कोरोनाग्रस्त)

अस्वस्थ असलेल्या कदम यांनी 12 मार्चला इटलीतील भारतीय दुतावासाला SOS मेल पाठवून मदतीची मागणी केली. 13 मार्चला रात्रीच त्यांना भारतीय दुतावासाकडून अनपेक्षितपणे फोन आला. त्यांना त्यावेळी सांगण्यात आले की, त्यांची मुलगी सुखरूप भारतात परत येत आहे. त्यांची मुलगी 15 मार्चला भारतात परतली आणि तिला आयटीबीपी रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

(हे वाचा-LIVE Coronavirus Updates : इराणमध्ये अडकलेल्या 'त्या' 255 भारतीयांना कोरोना)

कदम सांगतात की त्यांनी गेली अनेक वर्ष भारत सरकारला बोल लावले आहेत. मात्र या घटनेनंतर त्यांनी सरकारचं कौतुक केलं आहे. मोदी सरकारने ‘Father Figure’ प्रमाणे काम केल्याचं ते म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, ‘या घटनेनंतर मी सांगू शकतो की मोदी सरकार माझ्या मुलीचे दुसरे पालक आहेत.’ त्याचप्रमाणे त्यांनी    भारतीय दुतावास, एअर इंडिया क्रू आणि आयटीबीपी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

First published: March 18, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या