या राज्यानं दिली सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा
उत्तराखंड राज्याने कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यांची उपस्थिती कार्यालयात अनिवार्य आहे, त्यांनीच फक्त ऑफिसमध्ये हजेरी लावावी, बाकीच्यांनी घरून काम करावं, असे आदेश देण्यात आले आहेत. अर्थात यातून पोलीस, आरोग्य, अन्न आणि पाणीपुरवठा, वाहतूक, वीज आणि स्वच्छता विभागातल्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी या खात्यातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात यावंच लागणार आहे.