धक्कादायक! परदेशातील तब्बल 276 भारतीय कोरोनाग्रस्त

धक्कादायक! परदेशातील तब्बल 276 भारतीय कोरोनाग्रस्त

इराणमध्ये अडकलेल्या तब्बल 255 भारतीय पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून हा आकडा खूप मोठा आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : सध्या देशभरात कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणमध्ये (Iran) तब्बल 255 भारतीय (Indians) कोरोनाग्रस्त (Covid - 19) असल्याचे वृत्त समोर आले आहे.

आधीच भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 149 पर्यंत पोहोचला असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात इराणमध्ये अडकलेल्या 255 भारतीयांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली. यामध्ये ही सर्वजणं कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हणजेच MEA ने (Ministry of External Affairs of India,) यांनी इराणमधील 255 भारतीयांना कोरोनाची बाधा झाल्याच्या बातमीची पृष्टी केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचा आकडा काढला तर 276 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यानुसार UAE मध्ये 12, इटलीत 5, हाँग-काँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकात प्रत्येकी एक भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित -सावधान! एसीमुळे कोरोनाचा धोका, उकाड्यात थंडावा घेताना विचार करा

दरम्यान भारतासाठी एक सकारात्मक बाब समोर आली आहे.

कोरोना विषाणूवर उपाय शोधण्यात भारताला मोठं यश मिळालं आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसच्या स्ट्रेन्सला (वेगवेगळे रूप) वेगळं केलं आहे ज्यामुळे विषाणूवर औषधं आणि लस तयार करण्यात मदत होईल.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मते, बरेच शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर काम करत होते. ते म्हणाले की, पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूची लागण वेगळी करण्यात यशस्वी केलं आहे.

असं म्हटलं जातं की, वैज्ञानिकांचा हा शोध कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. कोरोना विषाणूचे स्ट्रेन वेगळे करणंदेखील व्हायरसची तपासणी करण्यासाठी एक किट बनवण्यास बराच प्रयत्न करेल. एवढेच नव्हे तर किट बनविण्यात, औषधे शोधण्यात आणि लसांच्या संशोधनातही बरीच मदत होईल.

First published: March 18, 2020, 2:44 PM IST

ताज्या बातम्या