मुंबई, 18 मार्च : Coronavirus चा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. सांगितलेली खबरदारी न पाळणे आणि होम क्वारंटाइनची सूचना न ऐकणे यातून हा व्हायरस देशभरात पसरू शकतो आणि त्याचंच उदाहरण आज मुंबईत उघडकीस आलं. जर्मनीहून आलेले चार जण क्वारंटाइनचा सल्ला असूनदेखील चक्क गर्दीच्या आणि AC ट्रेनमध्ये बसून प्रवास करताना आढळले. हातावर मारलेल्या स्टँपमुळे त्यांना ओळखून वेगळं करण्यात आलं.
परदेशातून येणाऱ्या सर्वांची विमानतळावरच तपासणी करण्यात येत आहे आणि त्यांना किमान 14 दिवस गर्दीत न मिसळता क्वारंटाइन करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. विलगीकरणाचा सल्ला दिलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर एअरपोर्ट सोडण्यापूर्वीच स्टँप मारण्यात येत आहे. त्यांनी गर्दीत मिसळणं टाळावं, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पण हा सल्ला काही प्रवासी अजिबात मनावर घेत नाहीत, असं दिसलं. हातावर स्टँप मारलेले चार प्रवासी गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये दिसल्यानंतर तिकीट तपासनीसाने कारवाई करत त्यांना ट्रेनमधून उतरवलं.
Chief Public Relation Officer, Western Railway: 4 persons suspected to have #COVID19 who had flown down from Germany&were heading to Surat, were deboarded from Garib Rath train in Palghar today. They had 'home quarantine stamp' on their hands, still they were defying the protocol pic.twitter.com/o24vk9LtQK
— ANI (@ANI) March 18, 2020
हे चौघेही जर्मनीमधून परतले आहेत आणि ते सुरतला निघाले होते. त्यासाठी त्यांनी गरीबरथ एक्स्प्रेस मुंबईहून पकडली.
वाचा - कोरोनाची धास्ती, भारतातून परतलेले आफ्रिकेचे खेळाडू 14 दिवस सेल्फ क्वारंटाइन
पालघर स्टेशनला तिकीट तपासनीसाने हा चौघांच्या हातावरच 14 दिवस घरात राहण्याचा स्टॅम्प बघितला आणि ट्रेनमधून उतरवलं. त्यामुळे बाकीच्यांना संभाव्य असलेला संसर्ग टळला. आता या चारही जणांना पालघरच्या जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.
अन्य बातम्या
खबरदार! जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार कराल तर.. छगन भुजबळांचा इशारा
भारत कोरोनाव्हायरसचा नवा केंद्रबिंदू होणार, तज्ज्ञ डॉक्टरचा दावा