मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Fire Video: मुंबईतील पवई परीसरात साई ऑटो ह्युंदाईच्या सर्विस सेंटरमध्ये अग्नितांडव

Mumbai Fire Video: मुंबईतील पवई परीसरात साई ऑटो ह्युंदाईच्या सर्विस सेंटरमध्ये अग्नितांडव

मुंबईत कार सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव, घटनास्थळी स्फोटांचा आवाज

मुंबईत कार सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव, घटनास्थळी स्फोटांचा आवाज

Mumbai Fire: मुंबईत पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे.

मुंबई, 18 नोव्हेंबर : मुंबईतील (Mumbai) पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टुबरो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग (Fire at Sai Auto Hyundai service center) लागली. यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहचले. (Massive fire catches in Sai Auto Hyundai Service center Powai Mumbai)

आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं, ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. ही आग इतकी भीषण आहे की, आसपासच्या परिसरात सर्वत्र धुराचे लोट पहायला मिळत होते. तसेच धुराचे लोट हे 20 ते 30 फुट उंचावर जाताना सुद्धा दिसून येत होते.

वाचा : भाजपमध्ये सर्वजण धुतल्या तांदळासारखे आहेत का? संजय राऊतांचा सवाल

गाड्या जळून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज

या आगीत शोरूममधून मोठं मोठ्या स्फोटाचे आवाज होत होते. तर या शोरूममध्ये कोट्यवधींच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

वन अविघ्न पार्क इमारतीत अग्नितांडव

22 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत इमारतीला भीषण आग लागली होती. लोअर परेल परिसरात रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. लालबाग (Lalbaug) परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला ही आग (Fire at One Avighna Park) लागली होती. ही आग लागल्यानंतर एका इसमाने इमारतीवरुन बचावासाठी 19व्या मजल्यावरुन उडी घेतली असल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला होता.

आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, इमारत उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती.

12 नोव्हेंबरला मानुखुर्दमध्ये आग

12 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मानखुर्दमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत अंदाजे 10 ते 12 दुकान जाळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. अवघ्या काही क्षणातच गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.

17 सप्टेंबर रोजीही मानखुर्दमध्ये भीषण आग

यापूर्वी 17 सप्टेंबर 2021 रोजीही पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मानखुर्द परिसरातील भंगाराच्या गोदामाला आग (fire breaks out at scrapyard) लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ही आग इतकी भीषण होती की आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांब-लांबून दिसत होते. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या भीषण आगीचे व्हिडीओ समोर आले होते. ते पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. शर्थीचे प्रयत्न करुन अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले होते.

First published:

Tags: Fire, Mumbai, Mumbai fire station