मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भाजपमध्ये सर्वजण धुतल्या तांदळासारखे आहेत का? संजय राऊतांचा सवाल

भाजपमध्ये सर्वजण धुतल्या तांदळासारखे आहेत का? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut File Photo

Sanjay Raut File Photo

Sanjay Raut: शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेचं संजय राऊत यांनी समर्थन केल्याचं पहायला मिळालं.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 18 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधकांवर निशाणा साधल्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडून जे सुरू आहे त्याची किंमत चुकवावी लागेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले, शरद पवार जे बोलले आहेत ती त्यांची चीड, संताप आणि वेदना आहेत. या आमच्याही वेदना आहेत. आमच्या मनात राग आहे. आम्ही जे सरकार बनवलं आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार ते या चीडीतून बनवलेलं सरकार आहे.

सत्तेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी काहीही सुरू आहे, कैंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. हे लोकशाही संकेताला धरून नाहीये. शरद पवारांनी सांगितलंय, याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नक्कीच चुकवावी लागेल. या देशातील जनता कधीच कुणाला माफ करत नाही. हे आपण इंदिराजींच्या काळातही पाहिलं आहे असंही संजय राऊत म्हणाले.

वाचा : 'राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका'

आम्ही सगळेच प्रमुख, पवार कुटुंबीय, छगन भुजबळांना तर क्लीन चिट मिळाली आहे. मग त्यांनी इतका काळ तुरुंगात घालवला त्याचं काय? त्याची भरपाई कोण करणार? आमचे अनिल परब, प्रताप सरनाईक आहेत.. केवळ आम्हीच तुम्हाला दिसतोय का? तुमच्या पक्षात सर्वचजण धुतल्या तांदळासारखे आहेत का? आम्ही तुम्हाला घाबरत नाही कारण आम्ही काहीच पाप केलं नाही. तुम्ही जी चिखलफेक करत आहात त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल असंही संजय राऊत म्हणाले.

अनिल देशमुखांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू - शरद पवार

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी बुधवारी (17 नोव्हेंबर 2021) म्हटलं, 'अनिल देशमुख यांनी वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे'. तसंच, अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय, मात्र त्यांचा त्रासाचा एक एक मिनिट वसूल करेल, ते पुन्हा सक्रिय होतील, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे की मी नागपूरला आलो व अनिल देशमुख माझ्या सोबत नाही. अनिल देशमुख यांनी वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला सक्षमपणे हाताळलं. मात्र काही लोक केंद्रातील सत्तेचा दुरुउपयोग करत आहे. काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही. सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायची असतात. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली, पाय जमिनीवर नसले त्यांची सत्ता गेली तर ते अस्वस्थ होतात. मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही, असं म्हणत पवारांनी भाजपवर घणाघात केला.

तसंच, 'सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे असते, काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेली व सुडाचे राजकारण सुरू केले. मात्र आमचे कार्यकर्ते अशा लोकांना व्याजासह अद्दल घडवल्या शिवाय राहणार नाही, असा कडक इशारा पवारांनी दिला.

First published:

Tags: BJP, Sanjay raut, शरद पवार