मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Fire: मुंबईत इमारतीला भीषण आग, तरुणाची 19व्या मजल्यावरुन उडी, अंगावर काटा आणणारा VIDEO

Mumbai Fire: मुंबईत इमारतीला भीषण आग, तरुणाची 19व्या मजल्यावरुन उडी, अंगावर काटा आणणारा VIDEO

मुंबईत इमारतीला भीषण आग, तरुणाची 19व्या मजल्यावरुन उडी, अंगावर काटा आणणारा  VIDEO

मुंबईत इमारतीला भीषण आग, तरुणाची 19व्या मजल्यावरुन उडी, अंगावर काटा आणणारा VIDEO

Mumbai Fire: मुंबईत रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली असून बचावासाठी एका व्यक्तीने 19व्या मजल्यावरुन उडी घेतली. हा व्यक्ती इमारतीवरुन खाली पडत असतनाचा अंगावर काटा आणणारा VIDEO समोर आला आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 22 ऑक्टोबर : मुंबईतील (Mumbai) लोअर परेल परिसरात (Lower Parel) रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. लालबाग (Lalbaug) परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला ही आग (Fire at One Avighna Park) लागली आहे. ही आग लागल्यानंतर एका इसमाने इमारतीवरुन बचावासाठी 19व्या मजल्यावरुन उडी घेतली असल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, इमारत उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत आहेत. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडलेला हा इसम इमारतीचा सुरक्षारक्षक असल्याचं बोललं जात आहे. हा इसम आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीत आला. मात्र आगाच्या ज्वाळा इतक्या होत्या की त्या इसमाने आपला बचाव करण्यासाठी गॅलरीला लटकला. यानंतर या इसमाने इमारतीवरुन उडी घेतली. या इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या इमारतीत अद्यापही दोन नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. 19व्या मजल्यावर लागलेली ही आग आता इमारतीच्या इतर मजल्यांवर सुद्धा पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. मुंबईतील लालबाग परिसरात इमारतीला भीषण आग, LIVE VIDEO आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमी व्यक्तीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, इमारतीमधून रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीत काही काम सुरू होते आणि त्यावेळी आगीची ठिणगी उडून ही आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ही आग कशामुळे लागली याबद्दल अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. राम तिवारी नावाची व्यक्ती लटकत होती. 10 मिनिटांपेक्षा जास्त ही व्यक्ती लटकत होती. खाली पडल्याने त्याला दुखापत झाली होती उपचारा दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. राम तिवारी ज्यावेळी इमारतीला लटकत होते. त्यादरम्यान थोडी समयसूचकता दाखवली असती, पडू नये याची काळजी घेतली असती तर त्याचा आज जीव वाचला असता. मृत राम तिवारी या इमारतीतलाच कामगार होता, असं महापौर म्हणाल्या आहेत.
First published:

पुढील बातम्या