मुंबई, 12 नोव्हेंबर : मुंबईतल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर मंडाला येथील भंगार दुकानांना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मोठी आग (Mumbai Mankhurd Fire) लागली. अंदाजे 10 ते 12 दुकान जाळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात काही केमिकल, लाकडी सामान, भंगार विक्रीचं साहित्य असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. या परिसरात नेहमीच आग लागण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत.
— News18Lokmat (@News18lokmat) November 12, 2021
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अवघ्या काही क्षणातच गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
#WATCH | Fire breaks out in Mandala scrap market godowns in Mankhurd area of Mumbai
"We got info about the fire at around 3 am. 12 fire engines, 10 tankers along with 150 firefighters have been deployed for fire fighting operation. No casualty reported," said a fire officer pic.twitter.com/Zaf6KdkIcN — ANI (@ANI) November 12, 2021
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्या असून जवळपास 150 जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
17 सप्टेंबर रोजीही मानखुर्दमध्ये भीषण आग
यापूर्वी 17 सप्टेंबर 2021 रोजीही पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मानखुर्द परिसरातील भंगाराच्या गोदामाला आग (fire breaks out at scrapyard) लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ही आग इतकी भीषण होती की आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांब-लांबून दिसत होते. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या भीषण आगीचे व्हिडीओ समोर आले होते. ते पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. शर्थीचे प्रयत्न करुन अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले होते.
वाचा : मुंबईत इमारतीला भीषण आग, तरुणाची 19व्या मजल्यावरुन उडी
वन अविघ्न पार्क इमारतीत अग्नितांडव
22 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत इमारतीला भीषण आग लागली होती. लोअर परेल परिसरात रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. लालबाग (Lalbaug) परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला ही आग (Fire at One Avighna Park) लागली होती. ही आग लागल्यानंतर एका इसमाने इमारतीवरुन बचावासाठी 19व्या मजल्यावरुन उडी घेतली असल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला होता.
आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, इमारत उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.