मुंबई, 23 ऑगस्ट: कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण करणाऱ्या(Coronavirus genome sequencing) मुंबईतील पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोविड चाचणीच्या 188 नमुन्यांमध्ये सर्वाधिक 128 रुग्ण डेल्टा विषाणूचे आहेत. अल्फा 2, केपा 24, तर इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू आढळले असल्याचं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलं.
कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे आकडे सांगत असले तरी साथ संपलेली नाही. कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचं नागरिकांनी कठोर पालन करावं, असं आवाहन सरकारने केलं आहे.
Next Generation Genome Sequencing करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित झाल्यानंतर करण्यात आलेल्या पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. पहिल्या तुकडीतील एकूण 188 नमुन्यांमध्ये 128 रुग्ण हे डेल्टा प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सव होणारच, राम कदमांचं ठाकरे सरकारला चॅलेंज
डेल्टा प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, निर्बंध पाळणं आवश्यक आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
6 कोटीची यंत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४ ऑगस्टला कस्तुरबा रुग्णालयातल्या जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचं लोकार्पण केलं होतं. आले. यानंतर या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जनुकीय सूत्र निर्धारण करू शकणारे दोन संयंत्र उपलब्ध आहेत.
कोरोनासाठी BMCनं खर्च केले इतके हजार कोटी, खर्चाचा आकडा Shocking
अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण 6 कोटी 40 लाख रुपये किंमतीची ही 2 जिनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे.
सिक्वेन्सिंग कशासाठी?
विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे 384 वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन 4 दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.
रात्रभर रांगेत उभं राहूनही नाही मिळाली लस; लसीकरण केंद्राबाहेरच नागरिकांचा राडा
या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्याच चाचणी तुकडीचा (फर्स्ट बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 192 रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Mumbai, Mumbai News