मुंबई, 22 ऑगस्ट : 'बिअर बारला नियम लावता येतात, तसे नियम तुम्ही मंदिरं आणि उत्सव साजरा करताना का लावत नाही? सरकारने किती ही अडवले तरी घाटकोपरमध्ये उत्सव (ghatkopar dahihandi 2021) साजरा होणार, आम्ही सरकारचा कुठलाच फतवा आम्ही मानणार नाही' असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी घोषणा केली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने यंदाही दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे. मात्र, भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शडू ठोकला आहे.
'महाराष्ट्रच्या जनतेला अपेक्षा होत्या. की नियमांचे पालन करून उत्सव साजरा करता येईल. पण हे अपशकुनी सरकार आहे. मंदिरं उघडताना पण नियम पाळा असे आम्ही म्हणालो. सरकारच्या नियमांचे पालन करत गोविंदांची सण साजरा व्हावा असे आम्हाला वाटते
देशातली सर्वात मोठी हंडी घाटकोपरची आहे. आम्हाला निमंत्रण का नाही? असा सवाल कदम यांनी उपस्थितीत केला.
तालिबानमुळे क्रिकेटपटूशी होणारे लग्न मोडणार, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला भीती
'सरकारचे आजी-माजी आमदार यांनाच आजच्या बैठकीला बोलावलं. शिवसेनेचे लोक होते. ते काय बोलणार? मुख्यमंत्र्यांपुढे ते काय बोलणार
तुम्हीला तुमचे निर्णय थोपायचे आहेत मग बैठकीचे नाटक कशाला? असा सवालही कदम यांनी केला.
'सर्व घोषणा फसव्या आहेत, बार उघडताना तिसरी लाट आडवी येत नाही. लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काय काळजी घ्यावी, हे एसीच्या घरात बसणाऱ्यांनी सांगू नये. या तीन पक्षांमुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कुठलाच विकास या सरकारने केला नाही. या सरकारकडे लोकांचा आवाज दाबण्यापेक्षा दुसरे काहीच येत नाही, अशी टीकाही कदम यांनी केली.
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाचा पहिला Video; योगा करताना सकात्मकतेचा संदेश
'राणेंच्या आशीर्वाद यात्रेत ५० पेक्षा जास्त गुन्हे, मग शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर का नाही करत. आम्ही म्हणतच नाही की नियम लावू नका. उलट सगळेच म्हणत आहेत की नियम आणा. पण तुम्हीच म्हणता की होणार नाही. एकेकाळी हिंदुत्वाचा नारा देणारी शिवसेना आता हिंदूंवर अन्याय करू लागली आहे. शिवसेनेच्या लोकांना बोलायचे वेगळे होते पण ते बोलू शकले नाही', अशी टीकाही कदम यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ram kadam